आयपीएलच्या 16व्या हंगामातील 59वा सामना पंजाब किंग्ज जिंकला. या सामन्यात पंजाबसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान होते. पंजाबने हा विजय 31 धावांनी मिळवला. प्रभुसिमसन सिंग या सामन्याचा हिरो ठरला, ज्याने पंजाब किंग्जसाठी शतक ठोकले. सोबतच पंजाबच्या गोलंदाजी विभागची कामगिरी देखील उल्लखनीय होती.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. दिल्लीचा हा निर्णय योग्य देखील ठरला. पण एकटा प्रभसिमरन सिंग दिल्लीच्या गोलंदाजांना नडला. त्याने 61 चेंडूत कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. त्याने एकूण 65 चेंडू खेळले आणि 103 धावा करून बाद झाला. सॅम करन आणि सिकंदर रजा यांनी अनुक्रमे 20 आणि 11 धावांवर विकेट गमावल्या. या तिघांव्यतिरिक्त पंजाबचा एकही फलंदाज दोन आखडी धावसंख्या करू शकला नाही. प्रभसिमरनच्या शतकामुळे पंजाबला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 बाद 167 धावा करता आल्या.
168 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचे फलंदाज मैदानात आले. कर्णधार डेविड वॉर्नरने दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली केली. मात्र वॉर्नरला सलामीवीर फिन साल्टसह एकही फलंदाज अपेक्षित साथ देऊ शकला नाही. वॉर्नरने 27 चेंडूत 54 धावा करून विकेट गमावली. सलामीला आलेला फिन साल्ट याने 17 चेंडूत 21 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त पंजाबचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. दिल्लीने या सामन्यात 20 षटकांमध्ये 8 बाद 136 धावा केल्या.
या विजयानंतर गुणतालिकेत पंजाब किंग्ज सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 12 पैक 6 सामने जिंकले आहेत आणि त्यांच्याकडे एकून 12 गुण आहेत. लीग स्टेजमध्ये पंजाबला अजून दोन सामने खेळायचे असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स चालू हंगामातून बाहेर पडली आहे. दिल्लीने 12 पैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत आणि 8 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. (Delhi Capitals are the first team to bow out of IPL 2023.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍस्पायर चषक २०२३ । सिटीएफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्टस क्लब, संगम बॉईज उपांत्यपूर्व फेरीत
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक नाही अन् दोन वर्षांसाठी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड