---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये कासवगतीने चाललाय वॉर्नर! धावा करतोय मात्र स्ट्राइक रेट डाऊनच

On: मंगळवार, एप्रिल 11, 2023 10:33 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामना मुंबईने आपल्या बाजूने केला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दिल्लीने सर्वबाद 172 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने पुन्हा एकदा अर्धशतकी योगदान दिले. त्याने अर्धशतक झळकावले असले तरी, आता त्याच्यावर त्याच्या संथ खेळीमुळे टीका होताना दिसतेय.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वॉर्नर याने आक्रमक सुरुवात केली. मात्र फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आल्यानंतर तो काहीसा शांत झाला. त्यानंतर त्याच्या बॅटवर चेंडू नीट येत नव्हता. असे असताना देखील त्याने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे हंगामातील तिसरे अर्धशतक ठरले. 19 व्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 47 चेंडूवर 51 धावा केल्या. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. तर, त्याचा स्ट्राईक रेट 108 इतकाच राहिला.

वॉर्नर याने या हंगामात आतापर्यंत चारही सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. या चार सामन्यात त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके आली आहेत. लखनऊ, राजस्थान व मुंबईविरूद्ध त्याची ही अर्धशतके आली. या चार सामन्यात त्याच्या बॅटमधून 52 च्या सरासरीने 208 धावा निघाल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट केवळ 114 इतका सरासरी राहिला आहे. विशेष म्हणजे या चार सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही षटकार आला नाही.

या सामन्यात अर्धशतकाचा पल्ला पार करण्याआधी वॉर्नर याने आयपीएलमधील एक विक्रम देखील आपल्या नावे केला. त्याने कर्णधार म्हणून आयपीएल मध्ये सर्वात जलद 3000 धावा देखील पूर्ण केल्या.

(Delhi Capitals Captain David Warner Low Strike Rate In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---