मागील काही महिन्यांपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्याने टिकेचा धनी ठरलेला पृथ्वी शॉ सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ही चर्चा त्याच्या धुव्वादार फलंदाजीची आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामातील पहिल्या सामन्यापासून त्याने प्रशंसनीय फलंदाजी केली आहे. त्यातही गुरुवारी (२९ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात केलेल्या तडाखेबाज खेळीने त्याने पुन्हा एकदा सर्वांची जिंकले आहेत.
अगदी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत यानेही पृथ्वीचे कौतुक केले आहे. संघ व्यवस्थापनाला आधीपासूनच त्याच्यावर विश्वास असल्याचे त्याने सांगितले आहे.
सामन्यानंतर सादरीकरण कार्यक्रमात बोलताना पंत म्हणाला की, “पृथ्वी शॉमधील प्रतिभेशी आपण सर्वजण परिचित आहोत. परंतु त्याच्यावर विश्वास दाखवावा लागतो. जर त्याच्यावर विश्वास दाखवला, तर तो धमाल करू शकतो. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या व्यवस्थापनाने त्याला स्वतवरील आत्मविश्वास कायम ठेवण्यात फार मदत केली आहे.”
पृथ्वी शॉने दिल्ली-कोलकाता सामन्यात अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची झुंजार खेळी केली होती. यात खेळीसाठी त्याने ११ चौकार आणि ३ षटकार मारले होते. मुख्य म्हणजे त्याने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात २५ धावा चोपल्या होत्या. यात ६ चेंडूत ६ चौकार आणि एका वाइड बॉलचा समावेश होता.
हेच जर त्याच्या आयपीएल २०२१ मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. दरम्यान ३ अर्धशतके करत त्याने एकूण २६९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-