---Advertisement---

अशा पद्धतीने खेळाडूंना बाद न करण्याची रिकी पाँटिंगने दिली होती ‘या’ खेळाडूला ताकीद

On: सोमवार, सप्टेंबर 21, 2020 2:15 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून झाली आहे.  सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला. रविवारी (20 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात या स्पर्धेचा दुसरा सामना खेळला गेला. या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिग यांनी संघाचा फिरकीपटू आर अश्विनशी मंकडिंग बद्दल चर्चा केली.

अश्विनचा दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पहिला हंगाम आहे. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर होता आणि गेल्या आयपीएल हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. बटलरला अशा प्रकारे बाद केल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. मंकडिंग बद्दलची चर्चा यावर्षी आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देखील सुरू झाली होती. आता रिकी पाँटिंगने म्हटले आहे की, त्याने अश्विनला मंकडिंग पध्दतीने खेळाडूंना बाद करू नका असे सांगितले आहे.

रिकी पाँटिंगला इनसाइडर स्पोर्ट्सच्या नुकत्याच झालेल्या शो ‘अम्स्ट्रेड फेस 2 फेस क्रिकेट सीरिज’मध्ये विचारले गेले होते की तो अश्विनला स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या अंतिम षटकात मंकडिंग पध्दतीने एखाद्याला बाद करण्याची परवानगी देईल काय? यावर रिकी पाँटिंगने हसत हसत सांगितले की, ‘मी अश्विनला शेवटचे षटक टाकू देणार नाही.’

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार देखील म्हणाला, “आम्ही याबद्दल बोललो आहे. मी अश्विनला माझी इच्छा सांगितली आहे.  मी त्याला सांगितले आहे की, अश्विनने मंकडिंग करावे असे मला वाटत नाही. हा नियम योग्य वाटत नाही. पंचाने हे सुनिश्चित केले पाहिजे की नॉन-स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडत नाही.”

तथापि, मंकडिंग हा खेळाचा एक साधा नियम आहे.  तो पुढे म्हणाला की, ” मी या नियमामुळे खूष नाही.  तथापि, मी एमसीसीशी समितीशी बांधिल आहे. पंचांनी या बाबतीत अधिक सावध असले पाहिजे आणि फलंदाज फसवणूक करत नाहीत हे पहावे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---