आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. दिल्ली कॅपिटल्स संघासाठी या आयपीएलची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्लीने आपले पहिले पाच सामने गमावले होते. त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. मात्र त्यानंतर आता संघाबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रॅंचायजी पार्टीमध्ये एका खेळाडूने महिलेशी गैरवर्तन केले. त्यानंतर फ्रॅंचाईजीने खेळाडूंसाठी काही नियम बनवले आहेत. सदर घटनेनंतर हे नियम तात्काळ लागू करण्यात आले.
काय आहेत नवे नियम
दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या नियमानुसार, रात्री दहानंतर कोणताही बाहेरचा व्यक्ती खेळाडूंसोबत खोलीत असणार नाही. केवळ कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित राहू शकते. कोणत्याही मित्राला अथवा नातेवाईकांना भेटायचे असल्यास हॉटेलच्या रेस्टॉरंट व कॉफी शॉपमध्ये भेटावे. कोणालाही हॉटेलच्या बाहेर भेटायचे असल्यास त्याबाबतची कल्पना फ्रॅंचाईजीला द्यावी लागेल. कोणी या नियमांचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर त्या खेळाडूचा करार देखील रद्द केला जाऊ शकतो.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची संघमालकी जीएमआर ग्रुप व जिंदाल ग्रुपकडे आहे. दिल्लीने मागील काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चालू हंगामात त्यांना उशिरा विजयी लय सापडली असली तरी, सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतील.
(Delhi Capitals Cricketer Misbehave With Lady In Franchisee Party New Guidelines Announced)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड क्रिकेटमध्ये येणार भूकंप? आयपीएल संघांनी राष्ट्रीय संघ सोडण्यासाठी दिली कोट्यावधींची ऑफर? वाचा सविस्तर
मॅचविनर ठरूनही रॉयवर झाली कारवाई! सामन्यादरम्यान केलेली ती चूक भोवली