---Advertisement---

स्टिव्ह स्मिथच्या प्रवेशाने दिल्लीचे पारडे जड, आयपीएल चषकावर कोरणार नाव? ‘अशी’ आहे अय्यरची नवी टीम

On: शुक्रवार, फेब्रुवारी 19, 2021 10:00 PM
---Advertisement---

नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा बहुप्रतिक्षित लिलाव पार पडला आहे. चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघातील रिक्त स्थाने भरून काढली. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचाही समावेश होता. गतवर्षी उपविजेता ठरलेल्या दिल्लीने यंदा एकूण ८ खेळाडूंना विकत घेतले. त्यातही अनुभवी स्टिव्ह स्मिथला स्वस्तात खरेदी करण्यात त्यांना यश आले.

राजस्थान रॉयल्सने मुक्त केल्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर स्मिथ आयपीएल लिलावात उतरला होता. त्यामुळे बऱ्याच संघाची त्यांच्यावर नजर होती. मात्र युवा खेळाडूंची भरमार असलेल्या दिल्लीने २ कोटी २० लाखांची बोली लावत सहज त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले.

स्मिथव्यतिरिक्त टॉम करन आणि सॅम बिलिंग्ज या परदेशी खेळाडूंवर दिल्लीने कोटींची बोली लावली. तर भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादवलाही एका कोटीसह विकत घेतले. अशात युवा आणि अनुभवी खेळाडूंसह संतुलित बनलेला हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

दिल्ली कॅपिटल्स – २५ खेळाडू (८ परदेशी)

लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स , एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू –  
टॉम करन(५.२५ कोटी), स्टिवन स्मिथ(२.२० कोटी), सॅम बिलिंग्ज(२ कोटी), उमेश यादव(१ कोटी), रिपाल पटेल(२० लाख), विष्णू विनोद(२० लाख), लुकमन हुसेन मेरिवाला(२० लाख), एम सिद्धार्थ(२० लाख)

महत्त्वाच्या बातम्या-

कुणाचे वडील टेम्पो चालवत, तर कुणी पाहिली भयंकर गरिबी; वाचा आयपीएलने एका रात्रीत कोट्याधीश बनवलेल्या युवकांची कहाणी

पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक पंजाब किंग्जने परदेशी खेळाडूंसाठी ओतलाय बक्कळ पैसा! पाहा संघातील एकूण खेळाडूंची यादी

इतिहासातील महागडा गोलंदाज ताफ्यात घेतल्याने बदलणार का राजस्थानचे नशीब? पाहा ‘ख्रिस मॉरिस’सह कसा आहे नवा संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---