---Advertisement---

गुवाहाटीत कोण मारणार बाजी? टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, राजस्थानचे ‘रॉयल्स’ करणार बॅटिंग

On: शनिवार, एप्रिल 8, 2023 3:15 PM
RR-vs-DC
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे 7.30 वाजता पार पडणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दिल्लीने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून राजस्थान स्पर्धेतील दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. तसेच, दिल्ली पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

या सामन्यात दिल्ली आणि राजस्थान दोन्ही संघात बदल आहेत. दिल्ली संघात मिचेल मार्शच्या जागी रोवमन पॉवेल याला संधी मिळाली आहे. तसेच, ललित यादव, मनीष पांडे परतले आहेत. तसेच, राजस्थानचा जोस बटलर हादेखील फिट असून संघात सामील आहे.

या स्पर्धेत राजस्थान संघाने दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे आणि दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. दुसरीकडे, दिल्ली संघाने स्पर्धेत खेळलेले दोनन्ही सामने गमावले आहेत. अशात दोन्ही संघ हा सामना जिंकून आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

उभय संघातील प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स
जोस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

दिल्ली कॅपिटल्स
डेविड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रायली रुसो, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), एन्रीच नॉर्किया, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबई विरुद्ध चेन्नई सामना होणार रद्द?
Video: मेयर्सची विकेट पडताच हैदराबादच्या मालकिणीचे तुफान सेलिब्रेशन, काव्याच्या अंदाजावर चाहते फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---