आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्याचबरोबर संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा पूर्णतः अपयशी ठरलेला दिसला. संघाने त्याला सहा सामन्यांमध्ये संधी दिली. मात्र, एकदाही तो निर्णायक भूमिका बजावू शकला नाही. त्याला अखेरच्या सामन्यातून संघाबाहेर देखील करण्यात आले होते. आता याच मुद्द्यावर दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
शॉ यावर्षी आयपीएलमध्ये अत्यंत खराब फॉर्ममध्ये राहिला आहे. सहा सामन्यातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 15 राहिली असून, मुंबई इंडियन्सविरुद्ध आली होती. त्याने या हंगामात सहा डावांमध्ये 12,7,0,15,0 व 13 अशा धावा केल्या. त्याला दोन वेळा खाते देखील खोलता आले नाही. शॉ यावर्षी देशांतर्गत हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. त्यामुळे या आयपीएलमध्ये तो त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्याने या अपेक्षांवर पाणी फेरले.
त्याच्या याच कामगिरीनंतर रिकी पॉंटिंग यांनी म्हटले,
“मागील तेरा सामन्यांपासून पृथ्वी सलामीला आला आणि अपयश ठरला आहे. इतर संघाचे त्याच्यासारखेच सलामीवीर कितीतरी पटीने अधिक चांगले खेळताना दिसत आहेत.”
ते पुढे म्हणाले,
“पृथ्वी एक दर्जेदार खेळाडू आहे यात शंका नाही. त्यामुळेच त्याला संघात रिटेन केले होते. त्याने एकदा त्याला आवश्यक असलेले चेंडू खेळले तर तो एकहाती सामना जिंकून देतो. त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय नक्कीच सोपा नव्हता.”
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी या आयपीएलची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्लीने आपले पहिले पाच सामने गमावले होते. त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे.
(Delhi Capitals Head Coach Ricky Ponting Not Happy With Prithvi Shaw Performance In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊला घाम फोडणारा अथर्व तायडे आहे तरी कोण? अकोल्यात जन्म आणि दमदार आहे कारकीर्द
कॅप्टन राहुलच अपयश ठरतंय लखनऊच्या फायद्याचं! आयपीएल 2023 मधील ही आकडेवारी भन्नाट






