सध्या क्रिकेटजगतात टी20 विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. सुरुवातीपासूनच विश्वचषकातील सामने रोमांचक होताना दिसतायेत. त्यानंतर पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) पुढील हंगामाची चर्चा सुरू होताना दिसेल. याची सुरुवात आयपीएलच्या ट्रेडिंग विंडोने झाली आहे. अद्याप कोणत्याही संघाने खेळाडू बदली केले नसले तरीही, लवकरच पुढील हंगामासाठी पहिला ट्रेड येऊ शकतो. (IPL 2023 Trading)
आयपीएल 2023 साठी पहिली ट्रेडिंग विंडो सुरू झालेली आहे. या ट्रेडिंग विंडोद्वारे सर्व संघ इतर संघाकडून लिलावाव्यतिरिक्त खेळाडू परस्पर संमतीने आपल्याकडे घेऊ शकतात. या पहिल्या ट्रेडिंग विंडोचा कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, स्पर्धेचा लिलाव 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
एका प्रसिद्ध क्रिकेटसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हंगामातील पहिला ट्रेड करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स उत्सुक आहेत. मागील हंगामात चेन्नईचे नेतृत्व केलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजा याला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक आहे. या बदल्यात त्यांनी अष्टपैलू अक्षर पटेल व शार्दुल ठाकूर यांची मागणी केलीये. जडेजा व अक्षर दोघेही डाव्या हाताचे फिरकीपटू व आक्रमक फलंदाज आहेत. मात्र, जडेजाचा अनुभव अधिक आहे. मागील वर्षी चेन्नईने तब्बल 16 कोटींची रक्कम देत जडेजाला आपल्या संघात कायम केलेले. तर अक्षरला ही सहा कोटींची रक्कम दिली गेलेली.
दुसरीकडे अनेक वर्ष चेन्नईसाठी खेळलेल्या शार्दुलची दिल्लीने 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम देत आपल्या संघात निवड केली होती. मात्र, मागील हंगामात त्याची कामगिरी तितकी उल्लेखनीय राहिली नव्हती. त्यामुळे दिल्ली शार्दुलला रिलीज करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आले होते. परंतु, दिल्ली या ट्रेडसाठी होकार देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”