सध्या भारतभर सर्वत्र होळी (Holi) आणि धुळवड (Dhulwad) हे सण धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. अगदी क्रिकेटपटूही या सणांचा आनंद घेत आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या निमित्ताने भारतीय आणि परदेशी खेळाडू मुंबईमध्ये एकत्र जमले आहेत. अशात प्रत्येक फ्रँचायझीतील खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने धुळवड साजरी करत आहेत. नुकताच दिल्ली कॅपिटल्स संघानेही खेळाडूंचा होळी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दिल्ली (Delhi Capitals) ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघातील सहभागी सर्व खेळाडू एकत्र जमून होळीच्या निमित्ताने रंगांची उधळण करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या संघ सहकाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर तो एका-एकाला रंग लावतो. पुढे अष्टपैलू अक्षर पटेल, गोलंदाज कमलेश नागरकोटी, चेतन सकारिया आणि इतर खेळाडू रंग घेऊन एकमेकांना रंग लावतात. चेहऱ्यावर, केसांवर, खेळाडूच्या मागून जाऊन त्याला रंग लावणे, अशी मस्ती करताना सर्व खेळाडू दिसत आहेत. (Delhi Capitals Players Celebrated Holi)
दिल्ली संघाने हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सतरंगी यारी, रंगबेरंगी होळी.’
Satrangi Yaari 🤝🏼 Rang-Birangi Holi 🎨
A very Happy Holi, from our family to yours ❤️💙#YehHaiNayiDilli #IPL2022 #HappyHoli @TajMahalMumbai pic.twitter.com/shpFvUowpu
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 18, 2022
राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनीही साजरी केली होळी
दिल्ली संघाबरोबरच राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनीही होळीचा सण साजरा केला आहे. मात्र त्यांनी क्वारंटाईनवाली होळी साजरी केली आहे. कोविड-१९ मुळे सर्व खेळाडूंना मैदानावर उतरण्यापूर्वी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे बंधनकारक बनले आहे. त्यामुळे राजस्थान संघाने प्रत्येक खेळाडूच्या खोलीत रंगाने भरलेली वाटी पाठवत अनोख्या ऑनलाईन होळी साजरी केली आहे.
Yeh #Holi, quarantine waali. 💗#RoyalsFamily pic.twitter.com/pDIda2zKGK
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 18, 2022
व्हिडिओमध्ये दिसते की, प्रत्येक खेळाडूच्या खोलीत रंगाची वाटी पाठवली जाते. सोबतच त्यावर एक चिठ्ठी ठेवली गेली आहे, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळा संदेश लिहिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘ही होळी, क्वारंटाईनवाली होळी.’
दरम्यान आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. तर २९ मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. कोविड-१९ मुळे आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कधीकाळी मीडियम पेसर असलेला ग्लेन मॅक्सवेल कसा बनला ऑफ स्पिनर? रोचक आहे कहाणी
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
IPL 2022 | नवीन इनिंग सुरू करण्यासाठी डेल स्टेन भारतात दाखल, यंदा दिसणार ‘या’ भूमिकेत