इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत शनिवारी (२ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने होते. या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या चाहत्यांना काहीतरी वेगळेपण जाणवले. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू नेहमीची जर्सी न घालता रंगीबेरंगी जर्सी घालून मैदानात उतरले होते. काय होते यामागील खरे कारण? चला जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्स संघाने या जर्सीचा वापर एका विशेष कारणासाठी केला होता. ही जर्सी नियमित जर्सीच्या रंगापेक्षा हलक्या रंगाची होती. तर या जर्सीवर इंद्रधनुष्याचे रंग देखील होता. तसेच या जर्सीची कॉलर देखील जर्सीच्या रंगाची होती. यापूर्वी गेल्या हंगामात देखील दिल्ली कॅपिटल्स संघाने या जर्सीचा वापर केला होता.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हे जर्सी परिधान करण्यामागचे खरे कारण काय होते? याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “इंद्रधनुष्याच्या रंगाच्या जर्सीसह आम्ही आपल्या सुंदर देशाची विविधता साजरी करत आहोत.”
Celebrating the diversity of our beautiful country by embracing a colourful jersey 🌈
How good does our special #MIvDC jersey look? 🎨💙#YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/MRq6ApANqL
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 2, 2021
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने देखील लालऐवजी निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीचा मुख्य उद्देश कोविड -१९ महामारीदरम्यान काम करत असलेल्या कोविड योद्ध्यांच्या कामगिरीला सलाम करणे हा होता.
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ जर पराभूत झाला तर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी होती. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीकडून धडे घेतल्यानंतर जयस्वाल होणार ‘यशस्वी’, मोठी खेळी करण्यासाठी मिळालाय ‘हा’ गुरूमंत्र
जेव्हा अश्विनला तसा जल्लोष केल्याने खावे लागले होते धोनीचे बोलणे, सेहवागने सांगितला जुना किस्सा
सीएसके वि राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल