दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध संघाच्या खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असते.
नुकत्याच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात देखील रिषभबद्दल असाच एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळी रिषभ चक्क पॅन्टलेस असताना कॅमेऱ्यात टिपला गेला. त्यामुळे सोशल मीडियात अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर दुसऱ्या एका युजरने लिहले की, “रिषभला नक्की काय करायचे आहे?
My heart skipped a beat when he did this…. I was like wtf he's gonna do 😱😲#DCvKKR #DCvRCB #RishabhPant Shaw Mavi Morgan Gill Dhawan Sehwag Ranapic.twitter.com/MgLPV3L89U
— #RCB #PlayBold #WeAreChallengers (@KohliDiToli) April 29, 2021
एका ट्विटर युजरने रिषभचा उल्लेख,”पॅन्टलेस पंत” असा केला आहे.
My heart skipped a beat when he did this…. I was like wtf he's gonna do 😱😲#DCvKKR #DCvRCB #RishabhPant Shaw Mavi Morgan Gill Dhawan Sehwag Ranapic.twitter.com/MgLPV3L89U
— #RCB #PlayBold #WeAreChallengers (@KohliDiToli) April 29, 2021
spiderman spiderman
— Neetish (@Neetish) April 29, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, रिषभच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावत 154 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाता नाईट रायडर्सकडून अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने सर्वाधिक नाबाद 45 तर सलामीवीर शुभमन गिलने 43 धावांची खेळी केली. दिल्लीकडून अक्षर पटेल व ललित यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात 155 धावांच्या माफक धावसंख्येचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने केवळ 3 गडी गमावत पूर्ण केला. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीवीर पृथ्वी शॉने 82 धावांची शानदार खेळी केली. रिषभने देखील अखेरच्या क्षणात 8 चेंडूत आक्रमक 16 धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्सचे मनोधैर्य आणखीनच उंचावले गेले असून, त्यांचा पुढील सामना 2 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या समर्थकांना आशा असेल की रिषभ येणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आपली आक्रमक फलंदाजी दाखवून संघाला विजय मिळवून देईल.