---Advertisement---

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस करणार खेळ खराब? जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज

On: शनिवार, एप्रिल 4, 2026 11:52 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ मध्ये शनिवारी (४ एप्रिल) आपल्या घरच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. दुपारी ३.३० वाजता सुरू होणारा हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामाची सुरूवात विजयाने केली असून दुसऱ्या सामन्यातही त्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न असणार आहे.

दिल्लीच्या वरच्या फळीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात निराशा केली होती. त्यामध्ये १४२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची स्थिती २६ धावांवर ४ विकेट्स अशी झाली होती. आयपीएलमधील सर्वोत्तम सलामीवीर केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नितीश राणा आणि पथुम निसांका यांनीही निराशा केली होती. समीर रिझवी या युवा खेळाडूने त्याच्या संयमी खेळीने नाबाद अर्धशतकी खेळी करत दिल्लीचा विजय निश्चित केला. तो सामना दिल्लीने ६ विकेट्सने जिंकला.

दिल्लीची गोलंदाज भक्कम दिसत आहे, मात्र मुंबईचीही फलंदाजी काही कमी नाही. त्यांचे रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २२१ धावांचा यशस्वी पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली होती.

येथे हंगामातील पहिला सामना असल्याने आणि दुपारनंतर पावसाटी शक्यता असल्याने परिस्थिती महत्वाची भुमिका बजावू शकते. खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना कमीत कमी मदत मिळण्याची शक्यता आहे. कारण नेहमीपेक्षा खेळपट्टीवर चेंडूला लक्षणरित्या कमी वळण मिळेल. सामन्याच्या सुरूवातीला विशेषत: हवामानामुळे खेळपट्टी थोडी चिकट असू शकते, ज्यामुळे फलंदाजांसाठी खेळपट्टी स्थिर होण्याआधी वेगवान गोलंदाजांना चेंडूला थोडी हालचाल करण्यास मदत होऊ शकते.

दिवसा हलका सूर्यप्रकाश असून हवामान हळूहळू ढगाळ होईल आणि दुपारच्या वेळी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता देखील चिंतेचा विषय आहे.

दोन्ही संभाव्य संघ-
दिल्ली कॅपिटल्स
– केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार.

मुंबई इंडियन्स – रायन रिकल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर/एएम गझनफर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---