भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने दिल्ली कॅपिटल्सविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षीच्या आयपीएल हंगामात अजून एकही सामना जिंकला नाहीये. मंगळवारी (11 एप्रिल) दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील सलग चौथा सामना गमावला. याच पराभवानंतर आकाश चोप्राने दिल्लीविषयी मोठी भविष्यवाणी केली.
दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम सुरूवातीपासूनच आव्हानात्मक राहिला आहे. दिल्लीचा नियमित कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीच्या कारणास्तव यावर्षी आयपीएल खेळू शकत नाहीये. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर (David Warner) याला आरसीबीचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. पण त्याच्या नेतृत्वात हंगामातील चारली सामने दिल्लीने गमावले. आकाश चौप्रा (Akash Chopra) याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना वॉर्नरवर देखील निशाणा साधला. चोप्राच्या मते दिल्ली कॅपिटल्स संघ यावर्षी प्लेऑफ्समध्ये जागा मिळवू शकणार नाही.
आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला, “दिल्ली संघ चार पैक चारही सामन्यात पाभूत झाला. हे जवळपास पक्के झाले आहे की, संघ आता प्लेऑफ्समध्ये जाणार नाहीये. डेविड वॉर्नर खूप चांगला खेळत आहे… पण तो खरोखर चांगला खेळत आहे? हा मोठा प्रश्न आहे. तो धावा करत आहे. चार सामन्यात तीन अर्धशतके केली आहेत, पण अजून एकही षटकार मारला नाहीये. जवळपास 200 चेंडू त्याने खेळले आहेत आणि अजून एक षटकार मारला नाहीये.”
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी आपले होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव स्वीकारला. या सामन्यात दिल्लीसाठी कर्णधार डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतके ठोकली. पण प्रत्युत्रात मुंबईने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. जिंकण्यासाठी मुंबईला 173 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्या त्यांनी शेवटच्या चेंडूवर गाठले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठ्या काळानंतर आयपीएलमध्ये अर्धशतक केले. 45 चेंडूत 65 धावा केल्यानंतर रोहितला सामनावीर म्हणून निवडले गेले. (Delhi Capitals will not make it to the playoffs, says Akash Chopra)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन नात्याने धोनीची सीएसकेसाठी 200वी मॅच, दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहेत ‘हे’ कर्णधार
CSKvRR: 200 व्या सामन्यात नाण्याचा कौल धोनीच्या बाजूने, राजस्थानची प्रथम फलंदाजी