महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यात एकेवेळी दिल्लीची स्थिती खूपच खराब होती. मात्र, राधा यादव आणि शिखा पांडे यांच्या नाबाद 52 धावांच्या शानदार भागीदारीमुळे दिल्लीने शंभर धावांचा आकडा पार केला. तसेच, मुंबई इंडियन्सपुढे 132 धावांचे आव्हान उभे केले.
दिल्ली कॅपिटल्स महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबई इंडियन्स महिला संघाच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. स्पर्धेत मोठमोठे आव्हान उभारणाऱ्या दिल्लीला या सामन्यात शंभर धावांचा आकडा पार करतानाही संघर्ष करावा लागला. यावेळी दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 131 धावा चोपल्या.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1640018557391212545
दिल्लीकडून फलंदाजी करताना शिखा पांडे (Shikha Pandey) आणि राधा यादव (Radha Yadav) या दोघींनी वादळी फलंदाजी करत संघाला संकटातून बाहेर काढले. या दोघींनी सामन्यादरम्यान प्रत्येकी नाबाद 27 धावा केल्या. यात राधाच्या 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. तसेच, शिखानेही 1 षटकार आणि 3 चौकारांची बरसात केली. या दोघींनी यावेळी नाबाद 52 धावांची भागीदारीही रचली. दिल्लीकडून सर्वाधिक धावा कर्णधार मेग लॅनिंग हिने केल्या. तिच्याव्यतिरिक्त मारिझाने केप हिने 18 धावा आणि शफाली वर्मा हिने 11 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यात इझी वोंग (Issy Wong) आणि हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) यांच्या नावाचा समावेश आहे. इझी वोंग हिने 4 षटकात 42 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या, तर हेलीने 4 षटकात 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यांच्याव्यतिरिक्त अमेलिया केर हिनेदेखील 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
आता 132 धावांचे हे आव्हान मुंबई इंडियन्स पार करणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (delhi capitals women scored 131 runs against mumbai indians womens in wpl final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भले शाब्बास! विंडीजच्या पठ्ठ्याने ठोकलं सर्वात वेगवान शतक, ख्रिस गेलचाही विक्रम काढला मोडीत
मायलेकाचं प्रेम! सचिनने आईसोबतचा खास व्हिडिओ केला शेअर, 3 तासात मिळालेत 2 लाख हिट्स