मंगळवारी (दि.) क्रिकेटप्रेमींना महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत डबल हेडर सामन्यांची मजा लुटण्याची संधी मिळाली. खरं तर, हा साखळी फेरीचा शेवटचा दिवस होता. यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात पार पडला. हा सामना मुंबईने 4 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसरा म्हणजेच स्पर्धेचा 20वा सामना यूपी वॉरियर्झ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला संघात पार पडला. हा सामना दिल्लीने 5 विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे, हा सामना जिंकताच दिल्लीने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 138 धावा केल्या. हे आव्हान दिल्लीने 17.5 षटकात 5 विकेट्स गमावत 142 धावा केल्या आणि तसेच 5 विकेट्सने विजय मिळवला.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1638228666844078080
दिल्लीकडून फलंदाजी करताना मेग लॅनिंग हिने 23 चेंडूंचा सामना करताना तडाखेबंद 39 धावांची खेळी साकारली. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त एलिस कॅप्सी हिने 34 धावा चोपल्या. तसेच, मारिझाने केप हिनेदेखील नाबाद 34 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त शेफाली वर्मा 21 धावांचे मौल्यवान योगदान दिले. यावेळी जेमिमा रॉड्रिग्ज हिला 3 धावांवर समाधान मानावे लागले. मात्र, शेवटी संघाला विजय मिळालाच.
यावेळी यूपीकडून गोलंदाजी करताना शबनीम इस्माइल हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 3 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त सोप्पधंडी यशश्री हिने 1 विकेट आपल्या नावावर केली.
मॅकग्राचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्झ संघाकडून ताहलिया मॅकग्रा हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 32 चेंडूत 58 धावा केल्या. या धावा करताना तिने 2 षटकार आणि 8 चौकारांचा पाऊस पाडला. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिने 36 धावा केल्या. तसेच, श्वेता सेहरावत हिने 19 आणि सिमरन शेख हिने 11 धावांचे योगदान दिले. यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाजाला 10 धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे यूपीला 138 धावाच करता आल्या.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना एलिस कॅप्सी हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 26 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त राधा यादव हिने 2 विकेट्स, तर जेस जोनासन हिने 1 विकेट घेतली.
या विजयासह दिल्लीने 12 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. विशेष म्हणजे, या विजयामुळे दिल्लीने थेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता शुक्रवारी (दि. 24 मार्च) मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघात एलिमिनेटर सामना होणार आहे, तर या दोघांपैकी जो संघ जिंकेल, तो रविवारी (दि. 26 मार्च) दिल्ली कॅपिटल्स महिलाविरुद्ध अंतिम सामन्यात भिडेल. (Delhi Capitals Women won by 5 wickets against UP Warriorz)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत होताच खचली कर्णधार स्मृती मंधाना; म्हणाली, ‘….आमचा संघ खराब आहे’
भारतात जाऊन ‘हा’ संघ जिंकणार विश्वचषक, माजी दिग्गजाच्या मते फक्त टीम इंडियाचे असेल आव्हान