---Advertisement---

दिल्लीपुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला पंजाबचा डाव, १७ धावांनी सामना जिंकत प्लेऑफसाठी ठोकला दावा

On: सोमवार, मे 16, 2022 11:28 PM
Delhi-Capitals
---Advertisement---

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सोमवारी (१६ मे) आयपीएल २०२२चा ६४वा सामना खेळला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना उभय संघांसाठी प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. दोन्हीही संघांनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र दिल्लीने १७ धावांनी या सामन्यात बाजी मारली. हा त्यांचा हंगामातील सातवा विजय होता. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावा करू शकला.

दिल्लीची भेदक गोलंदाजी
दिल्लीच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पंजाबकडून यष्टीरक्षक जितेश शर्माने चिवट झुंज दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो ३४ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकारही मारले. तसेच जॉनी बेयरस्टो (२८ धावा), शिखर धवन (१९ धावा) आणि राहुल चाहर (नाबाद २५ धावा) यांनीही थोड्याफार धावा जोडल्या. पंजाबचे ६ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ४ षटके फेकताना ३६ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. एन्रिच नॉर्कियानेही एका विकेटचे योगदान दिले.

मिचेल मार्शचे झुंजार अर्धशतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. ४८ चेंडू खेळताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त दिल्लीकडून इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाही. सलामीला आलेल्या सरफराज खानने ३२ धावा जोडल्या. तसेच ललित यादव २४ धावा करून बाद झाला. कर्णधार रिषभ पंत या सामन्यात केवळ ७ धावांचे योगदान देऊ शकला.

या डावात पंजाबच्या गोलंदाजांनीही अप्रतिम प्रदर्शन केले. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. लिविंगस्टोनने ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत दिल्लीच्या ३ फलंदाजांना बाद केले. तर अर्शदीपने ३७ धावा देत ३ विकेट्स काढल्या. तसेच हरप्रीत ब्रारनेही एका फलंदाजाला तंबूत धाडले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अरे देवा! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट, पाहा पुढे काय झाले

अरेरे! आधी ९९, आता १९९; अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर झाला कसोटी क्रिकेटमधील ‘नकोसा’ विश्वविक्रम

पुण्याचा धीरज लांडगे करणार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---