आयपीएल 2025 स्पर्धेतील 24 वा सामना आज (10 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, व बंगळुरूला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 163 धावा केल्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. पण के एल राहुलने आज 93 धावांची शानदार पारी खेळली. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ विजय मिळवू शकला. त्याने 53 चेंडूत 93 धावा करत 7 चौकार व 6 षटकार झळकावले. ट्रिस्टन स्टब्सने 38 धावा केल्या. कर्णधार अक्षर पटेलने 15 धावा केल्या.
बंगळुरू संघासाठी 2 विकेट्स भुवनेश्वर कुमारने घेतल्या. तसेच यश दयाल व सुयश शर्माने 1-1 विकेट्स घेतली.
बंगळुरूसाठी प्रथम फलंदाजी करताना फील साल्टने 37 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने 4 चौकार व 3 षटकार झळकावले. तसेच विराट कोहलीने 22 धावा केल्या. या धावांसह त्याने आयपीएल मध्ये 1000 बॉउंड्री पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. तसेच कर्णधार पाटीदार आज काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही त्याने फक्त 25 धावा केल्या तसेच टीम डेविडने 37 धावा केल्या.






