---Advertisement---

RCB vs DC: भुवनेश्वर कुमारची शानदार गोलंदाजी! दिल्लीचे आरसीबीसमोर 163 धावांचे आव्हान!

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 46व्या आज (27 एप्रिल) सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) संघ आमने-सामने आहेत. दिल्लीच्या मैदानावर आरसीबीने टाॅस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान दिल्लीच्या संघाने 8 गडी गमावून 162 धावा केल्या आहेत.

दिल्लीसाठी प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी डावाची सुरूवात केली. दरम्यान अभिषेक पोरेलने 28 धावांची खेळी केली, त्याने आपल्या खेळीत 2 चौकारांसह 2 षटकार मारले. तर फाफ डु प्लेसिसने 26 चेंडूत 22 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकार लगावले. दिल्लीसाठी यष्टीरक्षक केएल राहुलने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. कर्णधार अक्षर पटेल 15 आणि ट्रिस्टन स्टब्स 34 धावा यांच्या जोरावर दिल्लीचा संघ 162 धावा करण्यात यशस्वी ठरला.

आरसीबीसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेतल्या. तसेच यश दयाल आणि क्रुणाल पांड्या यांनी प्रत्येकी 1-1 विकेट आपल्या नावावर केली. आता आरसीबीचा संघ 163 धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

दिल्ली कॅपिटल्स- फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---