दिल्ली । भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. गंभीरच्या मते दिल्लीतील एक लोकल रेस्तरॉ बार त्याचे नाव वापरून ग्राहकांना आकर्षित करत आहे. परंतु कोर्टाने हीच याचिका फेटाळून लावत त्या व्यक्तीला ते नाव वापरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
गंभीर सध्या गहुंजे येथे होणाऱ्या बंगाल विरुद्ध दिल्ली सामन्यासाठी तयारी करत आहे.
ज्या व्यक्तीच्या नावाने हे रेस्तरॉ बार चालवले जात आहे त्याचे नावही गौतम गंभीर आहे. तसेच त्याचे म्हणणे होते की त्याला हे नाव वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे.
गंभीरच्या मते त्याचे नाव या रेस्तरॉ बारला देणे हे एकप्रकारची फसवणूक आहे.तसेच आपले नाव वापरून एकप्रकारे ती व्यक्ती फायदा घेत आहे असेही त्याने निरीक्षण नोंदवले होते.
परंतु आता कोर्टानेच यावर पडदा टाकून हा विषय बंद केला आहे.