आयपीएल २०२० मधील क्वॉलिफायर २ सामना दिमाखात पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला धूळ चारत १७ धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयाचा हीरो मार्कस स्टॉयनिस ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह दिल्लीने मागील १२ हंगामात न जमणारा पराक्रम या हंगामात फत्ते केला आहे.
मागील १२ हंगामांनंतर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात मिळवले स्थान
बलाढ्य हैदराबाद संघाला नमवत अंतिम सामन्यात पोहोचण्याची तहान दिल्ली संघाने या हंगामात भागवली. मागील १२ हंगामानंतर दिल्लीने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याचा कारनामा केला.
यापूर्वीच्या हंगामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना २००८ मध्ये चौथ्या क्रमांकावर रहावे लागले होते. तर २००९ मध्ये हा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होता. मात्र त्यांना अंतिम सामन्यात स्थान मिळवता आले नव्हते. २०१०मध्ये ते पाचव्या क्रमांकावर राहिले.२०११ मध्ये त्यांना शेवटच्या क्रमांकावर रहावे लागले. मात्र २०१२ ला त्यांनी शानदार पुनरागमन करत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला. मात्र यावेळीही त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात अपयश आले.
२०१३ च्या आयपीएल हंगामात शेवटचे स्थानावर समाधान मानावे लागले होते. हीच गत त्यांची २०१४ च्या हंगामातही होती. परंतु २०१५ मध्ये ते एक स्थान वर येत सातव्या स्थानी विराजमान झाले होते. त्यानंतर २०१६ आणि २०१७ या हंगामात दिल्ली संघ सहाव्या क्रमांकावर होता.
आयपीएल २०१८ च्या हंगामात त्यांना पुन्हा शेवटच्या स्थानावर रहावे लागले होते. परंतु पुढील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये चांगली कामगिरी करत त्यांनी प्लेऑफमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.
दिल्ली कॅपिटल्सची मागील १३ हंगामातील कामगिरी
२००८ हंगाम- चौथे स्थान
२००९ हंगाम – प्ले ऑफ (पहिले स्थान, सेमीफायनलमध्ये पराभूत)
२०१० हंगाम – पाचवे स्थान
२०११ हंगाम – दहावे स्थान
२०१२ हंगाम – प्ले ऑफ (पहिले स्थान, क्वालिफायर २ मध्ये पराभूत)
२०१३ हंगाम- शेवटचे स्थान
२०१४ हंगाम- शेवटचे स्थान
२०१५ हंगाम- सातवे स्थान
२०१६ हंगाम- सहावे स्थान
२०१७ हंगाम- सहावे स्थान
२०१८ हंगाम- शेवटचे स्थान
२०१९ हंगाम- प्ले ऑफ (तिसरे स्थान, क्वालिफायर २ मध्ये पराभूत)
२०२० हंगाम*- अंतिम सामन्यात स्थान
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विक्रमवीर शिखर धवनच्या पारड्यात नव्या ‘रेकॉर्डची’ भर; रोहित-डिविलियर्सलाही टाकले मागे
आयपीएल २०२० लिलावात ‘हे’ काम करताच मुंबईला सापडली यशाची किल्ली!
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ