भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला. त्यानंतर आता मंगळवारी (11 ऑक्टोबर) मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे खेळला जाईल. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. मात्र, पाऊस खेळ करणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाला 9 धावांनी गमवावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत सात गड्यांनी मोठा विजय मिळवला. आता मालिकेचा निकाल लावणारा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. मात्र, दिल्ली येथे सातत्याने पाऊस होत असल्याने हा सामना पूर्ण होणार की पाऊस आपला खेळ करणार यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून असेल.
भारतीय संघाची फलंदाजी व गोलंदाजी सुदृढ दिसत आहे. कर्णधार शिखर धवन व शुबमन गिल अपयशी ठरले असले तरी, मधल्या फळीतील फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले आहे. युवा शाहबाज अहमद व वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील आपली छाप पाडली. त्यामुळे भारतीय संघात या निर्णायक सामन्यासाठी बदल करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
दुसरीकडे टी20 मालिका गमावल्यानंतर पाहुणा संघ वंदे मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचे सर्वच फलंदाज अप्रतिम कामगिरी करत आहेत. मात्र, गोलंदाजीत अनुभवी रबाडा वगळता इतरांना तितके यश लाभले नाही. अशा परिस्थितीत त्यांना सांघिक कामगिरी करावी लागेल.
संभाव्य भारतीय प्लेईंग इलेव्हन–
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, आवेश खान.
संभाव्य दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन-
जानेमन मलान, क्विंटन डी कॉक, रिझा हेन्रिंक्स, ऐडन मार्करम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज (कर्णधार), कगिसो रबाडा, बिजोन फॉर्चुन, वेन पार्नेल, एन्रिक नॉर्किए.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय