दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये दंगल न करता मोठा दंगा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मॉडेल टाऊन पोलीस स्थानक परिसरात, या कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या चकमकीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी एका कुस्तीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआरमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याचे देखील नाव समोर आले आहे.
दिल्लीतील मॉडेल टाऊन पोलीस स्थानकातील पोलिसांनी अनेक जागी शोध घेतला, परंतु तो काही हाती लागला नाही. चकमकीत झालेल्या कुस्तीपटूच्या हत्येच्या आरोपात सुशील कुमार फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच पोलिस दिल्ली एनसीआरसह इतर राज्यात देखील त्याचा शोध घेत आहे.
दिल्ली पोलिसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार या हत्येत समाविष्ट असल्याचा पुरावा आहे. तसेच अधिकाऱ्याच्या मते, पोलिसांनी सुशील कुमारचे सासरे सतपाल सिंग आणि १० ते १२ लोकांना विचारपुस केली आहे. जेव्हापासून या प्रकरणात सुशील कुमारचे नाव आले आहे, तेव्हापासून तो भूमिगत झाला आहे.
तसेच दिल्ली पोलिसांनी अधिक माहिती देत म्हटले की, “आम्ही या प्रकरणातील पीडितांचे निवेदन घेतले असून सर्वांनी सुशील कुमारवर आरोप केले आहेत. सुशीलला पकडण्यासाठी आम्ही छापा टाकत आहोत. पीडितांनी सुशील घटनास्थळी उपस्थित होता असा आरोप केला आहे. मंगळवारी व बुधवारी मध्यरात्री छत्रसाल स्टेडियमवर ही घटना घडली. या घटनेत २३ वर्षीय ज्युनियर कुस्तीपटू सागर राणा याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. तर २ कुस्तीपटू गंभीर जखमी आहेत.”
पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रिन्स दलाल यांच्या फोनमध्ये त्यांना घटनेचा एक व्हिडिओ सापडला असून त्यात सर्व हल्लेखोरांचे चेहरे दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूने टिपला ‘सुपरफास्ट’ झेल, संघ सहकाऱ्यांनाही काहीवेळ बसला नाही विश्वास; पाहा Video
दु:खद! मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाचे वडिल कालवश, काही दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण
‘त्याच्या’मुळेच सीएसके संघ यंदा आयपीएलमध्ये टिकून राहू शकला, पाहा दिग्गजाने कोणाची केली स्तुती