भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यात थोडीशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना भारताने अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांच्या शतकी भागीदारीने 262 पर्यंत मजल मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 1 बाद 61 अशी मजल मारलेली.
Travis Head's counter-attack gives Australia the momentum at stumps 👊#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/HS93GIyEwS pic.twitter.com/xBk322Sdtf
— ICC (@ICC) February 18, 2023
भारतीय संघाने पहिल्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपवला होता. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 अशी मजल मारलेली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रोहित व राहुल यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, नॅथन लायनने आधी राहुलला आणि त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळत असलेल्या चेतेश्वर पुजारा याला शून्यावर तंबूत पाठवले. त्यानंतर त्याने रोहित व श्रेयस अय्यर यांना देखील तंबूचा रस्ता दाखवला.
भारतीय संघ संकटात असताना विराट कोहली याने पुन्हा एकदा आपला अनुभव पणाला लावला. तो 44 धावांवर असताना त्याला वादग्रस्त पद्धतीने बाद ठरवण्यात. भारताने 139 वर आपले सात गडी गमावले असताना अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी धीराने भारताचा डाव पुढे नेला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा उधळून लावला. दोघांनी शतकी भागीदारी केली. अश्विनने 37 तर अक्षरने 74 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेताच अवघ्या चार षटकात भारताचे उर्वरित तीन फलंदाज बाद करत एका धावेची नाममात्र आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी नॅथन लायन याने पाच बळी टिपले.
दिवसातील उर्वरित 12 षटके फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाचा बळी लवकर मिळवला. मात्र, ट्रेविस हेडने आक्रमक नाबाद 40 व लॅब्युशेनने नाबाद 16 धावा करत ऑस्ट्रेलियाला दिवसाखेर 1 बाद 61 अशी मजल मारून दिली.
(Delhi Test Day 2 India Fight Back With Axar And Ashwin Partnership)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद