आज आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामातील सतरावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये खेळला गेला. हा सामना दिल्लीने 25 धावांनी जिंकला. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजीचे चेन्नईला आमंत्रण दिले होते. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना चेन्नई 20 षटकात फक्त 158 धावा केल्या.
दिल्लीसाठी सर्वाधिक धावा के एल राहुलने केल्या. त्याने 77 धावांची तुफानी पारी खेळली. त्याने 51 चेंडूत 77 धावा करत 6 चौकार तर तीन षटकार झळकावले. केएल राहुलमुळे दिल्लीचा संघ 183 धावसंख्या करू शकला. केएल राहुल आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जास्त अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांपैकी त्याने विराट कोहलीची बराबरी केली आहे, राहुलने 40 अर्धशतक केली आहेत. दिल्लीसाठी अभिषेक पोरेलने 33, अक्षर पटेलने 21, समीर रिजवीने 20, ट्रीस्टन स्ट्रब्सने 24 धावा केल्या. दिल्लीच्या विजयामध्ये आज राहुलने मोठी भागीदारी रचली.
Kamaal KL! 😎🏏
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2025
KL Rahul brings up a sublime fifty as he leads the charge for #DC, eyeing a historic win at Chepauk, their first since 2010!
Watch LIVE action ➡ https://t.co/4Kn2OwL1UW #IPLonJioStar 👉 #CSKvDC, LIVE NOW on Star Sports 2, Star Sports 2 Hindi & JioHotstar pic.twitter.com/bSx5mXAuoh
Pulled & SIX! 🏏💥
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2025
Rahul continues the charge for #DC vs #CSK!
Rahul 🤝 Porel, the partnership is flourishing for the Capitals!
Watch LIVE action ➡ https://t.co/4Kn2OwL1UW #IPLonJioStar 👉 #CSKvDC, LIVE NOW on Star Sports 2, Star Sports 2 Hindi & JioHotstar pic.twitter.com/B7ZDrw9TS8
चेन्नईच्या फलंदाजांना दिल्लीच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करू दिली नाही. रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, दुबे, जडेजा या खेळाडूंना आज दिल्लीच्या गोलंदाजांनी मैदानावर टिकूच दिले नाही. चेन्नईसाठी सर्वाधिक धावा विजय शंकरने केल्या. त्याने 54 चेंडूत 69 धावा केल्या. तसेच महेंद्रसिंग धोनीने 26 चेंडूत 30 धावा केल्या.
दिल्लीचा पुढचा सामना बंगळुरू विरुद्ध 10 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा सामना 13 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे.