---Advertisement---

पाकिस्तानचा खेळाडू झाला बेकाबू, चाहत्यांशी झाली झटापट!

On: शनिवार, एप्रिल 5, 2025 6:34 PM
---Advertisement---

न्यूझीलंडने पाकिस्तानचा वनडे मालिकेत दारुण पराभव केला. न्युझीलंडने ही मालिका 3-0 ने जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना शनिवार माउंट मोगांनुईमध्ये खेळला गेला. न्यूझीलंडने या सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये दावा करण्यात येत आहे की पाकिस्तानचा खेळाडू खुशदिल शाहचा सामन्यादरम्यान आलेल्या एकाच्या चाहत्याशी त्याचा वाद झाला.

एक्सवर खुशदिल शाहचे काही फोटो वायरल होत आहेत यामध्ये तो रेलिंगच्या मध्ये दिसत आहे. द फ्री प्रेस जनरलच्या एका माहितीनुसार खुशदिल चाहत्यांशी भांडण करण्यासाठी रेलिंग पलीकडे ओलांडून गेला. तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दावा केला जात आहे की, तिथे उभ्या असलेल्या एका चाहत्याने पाकिस्तान संघावर निराशा व्यक्त केली होती. यानंतर खुशदिल शाहने स्वतःवरचं नियंत्रण न सावरता संताप केला. याबाबत कोणतीही अजून अधिकृत माहिती मिळाली नाही.

खुश दिल शाहच्या या विषयावर इमरान सिद्धकी नावाच्या एका एक्स युजरने लिहिले आहे, दोन अफगाणी तरुणांनी पाकिस्तानी खेळाडूंशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. खुशदिल शाहने त्यांना शांत राहण्यासाठी सांगितले होते, पण त्यांनी ते ऐकले नाही व चुकीचे शब्द वापरले.

पाकिस्तान संघ टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 73 धावांनी पराभूत झाला होता. नंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांचा 84 धावांनी पुन्हा दारुण पराभव केला. यानंतर आज तिसऱ्या वनडे सामन्यात सुद्धा खराब पद्धतीने पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---