---Advertisement---

हा ठरला क्रिकेट इतिहासातील पहिला ‘इम्पॅक्ट प्लेयर’! मुंबई इंडियन्ससाठी दाखवलाय दम

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 12:14 PM
Mumbai-Indians-IPL
---Advertisement---

भारतातील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला मंगळवारी (11 ऑक्टोबर) सुरुवात झाली. भारतातील विविध शहरात सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी 17 सामने खेळले गेले. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने 71 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. त्याचवेळी या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर हा नियम वापरणारा पहिला संघ होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला. अष्टपैलू ऋतिक शोकीन हा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला.

 

या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मणिपूरसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्यासमोर या संघाला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 96 धावा करता आल्या.

मणिपूरविरुद्ध दिल्लीच्या डावाची सुरुवात करताना हितेन दलालने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने 47 धावांची सर्वोच्च खेळी केली. यानंतर कर्णधार दिल्लीचा कर्णधार नितीश राणाने ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाच्या मदतीने हितेनच्या जागी ऑफस्पिनर हृतिक शोकीनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. शोकीननेही चमकदार कामगिरी करत 3 षटकात 13 धावा देत 2 गडी बाद केले. सामन्यादरम्यान मणिपूरचा संघही या नव्या नियमाचा फायदा घेताना दिसला. मणिपूरने अहमद शाहच्या जागी बिस्वरजित कोन्थौजमला संधी दिली.

काय आहे नियम?
या नियमाच्या मदतीने फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या अनेक खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही बदली खेळाडूचा वापर करता येईल. नाणेफेकी दरम्यान, कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनसह अशा 4 खेळाडूंची नावे द्यावी लागतील जी त्याला सामन्यादरम्यान वापरायची आहेत. यापैकी संघ कोणत्याही एका खेळाडूला पर्याय म्हणून संधी देऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रथम फलंदाजी करताना एखाद्या संघाने आपला प्रमुख फलंदाज लवकर गमावला तर, इम्पॅक्ट प्लेअर नियमाच्या मदतीने तो गोलंदाजाच्या जागी एक अतिरिक्त फलंदाज म्हणून बदली खेळाडू संघात आणू शकतो. अशाप्रकारे कर्णधार व संघ व्यवस्थापन आपल्या पसंतीने इम्पॅक्ट खेळाडू मैदानात उतरवू शकतो. मात्र, इम्पॅक्ट प्लेयर आल्यानंतर मैदान सोडणाऱ्या खेळाडूला त्या सामन्यात पुन्हा मैदानावर येता येत नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंड्याला टक्कर द्यायला आला ‘हा’ ऑलराऊंडर! टी20 सामन्यात तुफानी फिफ्टी आणि घेतल्या 6 विकेट्स
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---