महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीने शिवनेरी सेवा मंडळाने काल १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान भावनी माता मैदान दादर (पूर्व) येथे राज्य पातळीवरील व्यावसायीक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे.
ही कबड्डी स्पर्धा शिवनेरी सेवा मंडळाचे संस्थापक मोहन राजाराम नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित केली गेली आहे. या स्पर्धाला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक नावाने सुद्धा ओळखले जाते.
युनियन बँक, सेंट्रल बँक, एअर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल रेल्वे, ठाणे पोलिस, मुंबई पोर्ट, रायगड पोलिस, जे जे हॉस्पिटल यासारख्या टीम पुरुष विभागात सहभागी होतील. शिवशक्ती, अनिकेत, सुवर्णयुग, शिवतेज, डॉ. शिरोडकर, महात्मा गांधी, स्वराज्य, संघ, होटकरू, अमर हिंद संघ महिला विभागातील असतील.
पुरुष विभागात बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध देना बँक यांच्यात झालेल्या सलामीच्या लढतीत देना बँकने बँक ऑफ महाराष्ट्र संघाचा ४९-०२ असा धुव्वा उडवला. महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध सेंट्रल रेल्वे याच्यात झालेल्या सामन्यांत महिंद्रा अँड महिंद्राने ३३-२२ असा विजय मिळवला.
महिला विभागात झालेल्या सलामीच्या लढतीत डॉ. शिरोडकर स्पॉ संघाने अमरहिंद मंडळ संघाचा ४१-३३ असा पराभव केला. मध्यंतरा पर्यत २३-२१ अशी शुल्लक आघाडी डॉ.शिरोडकर स्पॉ कडे होती. क्षितीज हिरवे व मेघा कदम यांनी सुरेख खेळ केला. श्रीराम पालघर विरुद्ध अनिकेत स्पॉ. रत्नागिरी याच्यात झालेल्या लढतीत अनिकेत स्पॉ ने ३५-१६ अशी बाजी मारली.
महात्मा गांधी स्पॉ. उपनगर विरुद्ध महात्मा फुले स्पॉ. उपनगर यांच्यातील सामना महात्मा गांधी संघाने ३९-१६ असा एकतर्फी जिंकला. पहिल्या दिवस असल्याकारणाने उद्घाटनमुळे सामने उशीरा सुरू झाले. त्यामुळे नंतर मॅट वर दव पडू लागल्यामुळे पहिल्यादिवशी ५ सामने झाले. आज दुसऱ्यादिवशी सामने ठीक ४ वाजता सुरू होणार आहेत.