आज (२७ ऑक्टोबर) झालेल्या देवधर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्णधार अजिंक्य रहाणेनच्या नाबाद शतकी खेळी आणि इशान किशनने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर इंडिया ‘क’ने इंडिया ‘ब’ला २९ धावांनी पराभूत केले.
फलंदाजी करताना इंडिया ‘क’ने प्रथम ५० षटकात ७ विकेट्सच्या बदल्याच ३५२ धावांचा डोंगर उभा केला. यावेळी रहाणेने नाबाद १४४ धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज इशान किशननेही ८७ चेंडूत ११४ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया ‘ब’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने ११४ चेंडूत ८ षटकाऱ्यांच्या मदतीने १४८ धांवाची तुफानी खेळी केली. पण त्याना ४६.२ षटकात सर्वबाद फक्त ३२३ धावाच करता आल्या.
या सामन्यातील अय्यरचे शतक उत्तम ठरले पण त्याला सहकाऱ्यांची योग्य ती साथ मिळाली नाही. त्याचा अडथळा राहुल चहरने दूर केला. बाद होण्याआधी त्याने दुसऱ्या विकेटसाठी रूतुराज गायकवाड(६०) सोबत ११६ धावांची भागीदारी केली.
अय्यर आणि अंकुश बेन्स यांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत संघाची जिंकण्याची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बेन्सने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. बेन्सला पप्पू रॉयने बाद केले. तेव्हापासूनच इंडिया ‘ब’ संघाच्या अडचणी वाढल्या. तरीही अय्यरने दिपक चहरच्या साथीने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
इंडिया ‘क’कडून रॉयने सर्वाधिक अश्या ३ विकेट्स घेत ७५ धावा दिल्या.
रहाणेने त्याचा खराब फॉर्म सोडत चांगला फलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार असणाऱ्या रहाणेने त्याच्या डावात ९ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याला किशनने ११ चौकार आणि ६ षटकार मारत योग्य साथ दिली.
तसेच इंडिया ‘ब’ संघाचा फक्त जयदेव उनाडकट हाच गोलंदाजीत हवा तसा यशस्वी ठरला. त्याने ५२ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या. यावेळी त्याला फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेने थोडीफार मदत केली. त्याने ९ षटकात ७० धावा देत २ विकेट्स घेतल्या.
It was a run-fest at the Kotla & India C are crowned Deodhar Trophy champions as they clinch the final by 29 runs. pic.twitter.com/ZQSOaLwOpD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 27, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: खेळाडू परतले, पंच मात्र निर्णय देण्यासाठी भरपावसात मैदानातच
–या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान