बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस शनिवारी (10 जुलै) आणि रविवारी (11 जुलै) विम्बल्डन अंतिम सामना बघण्यास गेली होती. शनिवारी विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला. तर रविवारी पुरुष एकेरीचा सामना झाला. महिला एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने करोलिना प्लिस्कोवाला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. तर पुरुष एकेरीचा सामना नोवाक जोकोविच विरुद्ध मतेओ बेरेटिनी यांच्यात झाला. यात जोकोविचने विजय मिळवत विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकले.
हे सामने पाहातानाचे फोटो प्रियंकाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये ती नताशा पूनावालासोबत दिसून येत आहे. प्रियंकाने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत ‘गर्ल्स डे आउट’ असे कॅप्शन देखील लिहिले आहे. यासह प्रियंकाने विम्बल्डन अंतिम सामन्याचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लुक सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. प्रियांका हाय-नेक, फुल स्लीव्हचा ड्रेस घातलेला दिसून आला आहे.
प्रियंकाने व्हिडिओ शेअर करत सांगितले की, तिच्या समोर ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज म्हणजेच प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनसुद्धा या सामन्यांचा आनंद घेताना दिसून आले आहेत.
याच दरम्यान प्रियंकाने पोस्ट केलेल्या अनेक फोटोमध्ये ती फोनवर व्यस्त असलेली दिसून आली. त्याचवेळी विम्बल्डनच्या सोशल मीडिया अकाउंटवरही प्रियंकाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात विंबलडनने प्रियंकाला फेसबुकवर खास पाहुणे म्हणून संबोधित केले आहे.
प्रियांकाव्यतिरिक्त दीपिका पादुकोन देखील वर्ष 2019 मध्ये विम्बल्डनचे सामने पाहायला आली होती. यादरम्यान, ती आपली बहीण अनिशा पादुकोनसोबत विम्बल्डन सामन्यांचा आनंद घेताना दिसून आली होती. तसेच यंदा हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, डेम मॅगी स्मिथ यांचीही उपस्थिती विम्बल्डनमध्ये पाहण्यास मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
“श्रीलंकेचा दुसर्या दर्जाचा संघात मैदानात उतरला, तर मालिकेला काहीच अर्थ राहणार नाही”