पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात देव नवले (155 धावा) व ओम खटावकर (नाबाद 133 धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघापुढे 335 धावांचे आव्हान उभे केले. तर, दुसऱ्या सामन्यात आदित्य राजहंस(166 धावा) याने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 339 धावा केल्या.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने आज दिवसखेर 93 षटकात 3 बाद 335 धावा केल्या. यात ओम खटावकरने 294 चेंडूत 19चौकार व 1 षटकारासह नाबाद 133 धावांची खेळी केली. ओमला देव नवलेने आक्रमक फलंदाजी करत 192 चेंडूत 26 चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 155 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 421 चेंडूत 261 धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पीवायसी हिंदू जिमखानाकडून ब्दुस सलाम (50-1), वैभव टेहळे (72-1), गुरवीर सिंग सैनी (48-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दोन्ही संघांचा अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.
लोणी येथील मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात पहिल्यांदा खेळताना युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव 71.4 षटकात 339 धावावर आटोपला. यामध्ये आदित्य राजहंसने धडाकेबाज फलंदाजी करत 204 चेंडूत 20 चौकार व 2 षटकारासह 166 धावांची खेळी केली. आदित्यने तनिष्क सितापुरे (55 धावा)च्या साथीत 118 चेंडूत 112 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर तनिष्क बाद झाल्यावर आदित्यने श्रीराज चव्हाण (59 धावा)च्या साथीत 160चेंडूत 146 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. डेक्कन जिमखानाकडून पुंडलीक पुजारीने 52 धावात 6 गडी बाद केले. दोन्ही संघांचा अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.
स्पर्धेचे उदघाटन गोल्फफिल्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोलीचे अनिल छाजेड, रिजुता भालेकर, तेजल भालेकर व पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अभिषेक ताम्हाणे, बिपीन चोभे, शिरीष साठे, सिद्धार्थ भावे, इंद्रजीत कामतेकर, रोहन छाजेड, अनुज छाजेड, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सामन्याचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव: ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 93 षटकात 3 बाद 335 धावा(देव नवले 155(192,26×4,3×6), ओम खटावकर नाबाद 133 (294,19×4,1×6), आकाश पांडेकर 22 (30), अब्दुस सलाम 15-50-1, वैभव टेहळे 17-72-1, गुरवीर सिंग सैनी (17-48-1) वि. पीवायसी हिंदू जिमखाना: पहिल्या डावात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाची 335 धावा;
लोणी मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 71.4 षटकात सर्वबाद 339 धावा (आदित्य राजहंस 166 (204,20×4,2×6), तनिष्क सितापुरे 55(71,4×4,4×6), श्रीराज चव्हाण 59 (54,9×4,1×6), पुंडलीक पुजारी 15.4-52-6, निखिल धारणे 12-31-2, रुद्राज घोसाळे 11-68-1, जय पाटील 12-61-1) वि. डेक्कन जिमखाना
महत्त्वाच्या बातम्या-
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना