---Advertisement---

‘…तो निव्वळ वेडेपणा होता’, बेबी एबीने शेअर केली सचिनच्या पहिल्या भेटीची आठवण

On: रविवार, जून 5, 2022 8:57 PM
Sachin-Tendulkar-Devald-Brevis
---Advertisement---

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने निराश केले. असे असले, तरी संघातील काही युवा खेळाडूंनी आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. यामध्ये सर्वात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवॉल्ड ब्रेविस. आयपीएल सुरू होण्यापूर्वी ‘बेबी एबी’ नावाने प्रचलित असलेल्या ब्रेविसने सर्वांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. त्याच ब्रेविसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ब्रेविसने एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रेविसने सचिनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ब्रेविस म्हणाला की, “मी जिमच्या जमिनीवर झोपलो होतो आणि अचानक सचिन सर दारात आले. मला काय करावे हे कळत नव्हते आणि मी पहिल्यांदाच त्यांच्याशी हात मिळवणी केली, हा वेडेपणा होता. मी त्यांना आदर्श मानले आहे आणि त्यांनी मला दिलेली छोटी तांत्रिक माहिती खास होती. सचिन आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांसारख्या दिग्गजांकडून शिकून खूप छान वाटले.”

ब्रेविसला यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबईने ३ कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. ब्रेविसला जगभरात त्याच्या फलंदाजीच्या आक्रमकतेमुळे ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. याआधी त्याने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना आकर्षक कामगिरी केली होता.

दरम्यान, ब्रेविला यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाकडून ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत ब्रेविसने २३च्या सरासरीने आणि १४२.२८च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या. त्याने फलंदाजीमध्ये सर्वाधिक ४९ धावांची खेळी झाली. आयपीएलचा १५वा हंगाम मुंबईसाठी खूपच खराब होता, संघ ८ गुणांसह गुणतालिकेत तळाशी राहिला. मात्र, ब्रेविससारखे हिरे सापडल्याने पुढील हंगामात संघ चांगली कामगिरी करेल असे म्हटले जात आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

न्यूझीलंडच्या फलंदाजाचा टी२० ब्लास्टमध्ये राडा! जबराट सिक्स मारताच चेंडूने गाठले बर्गरचे दुकान, VIDEO VIRAL

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दम दाखवला, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची विश्वचषकात जागा फिक्स?

स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---