फ्रान्समधील उत्तरपश्चिम भागात स्थित स्टेड ड्यू मोस्टोयर मैदानावर रविवारी (२० डिसेंबर) मोठी दुर्घटना घडली. एफसी लोरियंट आणि रेनेस संघात या मैदानावर फुटबॉल सामना झाला. या सामन्यात रेनेसने लोरियंटला ३-०ने पराभूत केले. हा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मैदानाबाहेर पडण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात कित्येक टन वनजाची, फ्लड लाईट दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारी शिडी एका ग्राउंडमनच्या अंगावर कोसळली. या अपघातात त्या ३८ वर्षीय ग्राउंडमनचा मृत्यू झाला.
गेट फुटबॉल न्यूज फ्रान्सने दिलेल्या माहितीनुसार, अंगावर वजनदार शिडी कोसळल्यानंतर तो ग्राउंडमन मदतीसाठी मोठ्याने ओरडू लागला. मैदानातील सर्व अलार्म वाजू लागले. हे पाहता ड्रेसिंग रूममध्ये असेलेले एफसी लोरियंट आणि रेनेस संघाचे सर्व खेळाडू आणि बोर्डाचे सदस्य मैदानाच्या दिशेने धावले. सुदैवाने आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या सदस्यांची एक टीम घटनास्थळी उपस्थित होती. त्यामुळे त्वरित त्या ग्राउंडमनला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याला खूप गंभीर इजा झाल्या होत्या. तसेच खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत.
सामन्यानंतर मैदानावरच ही दुर्घटना घडल्यामुळे लोरियंट संघाच्या खेळाडूंची सामन्यानंतर होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोरियंट संघाच्या सर्व फुटबॉलपटू आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मृत ग्राउंडमनच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना केली.
Joueurs, staff et salariés du FC Lorient ont effectué une minute de recueillement ce matin en hommage à Yohann décédé hier soir.
Le FCL tient à adresser toutes ses condoléances et son soutien à sa famille, ses proches et ses collègues. pic.twitter.com/KnhNHvNl2I
— FC LORIENT 🐟 (@FCLorient) December 21, 2020
या दुर्घटनेवेळी लोरिंयटचे महापौर फ्रेबाइस लोहर स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “ही खूप भयानक दुर्घटना होती. लोरियंट चौकीच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या दुर्घटनेमागील कारण उघडकीस येईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल २०२०: बेंगळुरूची घोडदौड एटीके मोहन बागानविरुद्ध खंडित; विल्यम्सचा गोल ठरला निर्णायक
लिओनेल मेस्सीची महान फुटबॉलपटू पेलेंच्या विश्वविक्रमाची बरोबरी, पाहा काय केलाय पराक्रम
आयएसएल २०२०: स्वयंगोल होऊनही ब्लास्टर्सने ईस्ट बंगालला रोखले