---Advertisement---

NZA vs INDA: उघड अप्रामाणिकपणा… पंचांनी पडिक्कलला 199 धावांवर चुकीचे बाद दिले! भारतीय फलंदाज भडकला, VIDEO

On: सोमवार, ऑक्टोबर 26, 2026 1:39 PM
---Advertisement---

भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल द्विशतक करण्यापासून अवघ्या एका धावेने मुकला. न्यूझीलंड अ आणि भारत अ यांच्यात पहिला अनधिकृत कसोटी सामना लिंकन येथे खेळला जात आहे. आज (२६ ऑक्टोबर) या सामन्याचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पडिक्कलने २४८ चेंडूंत २४ चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने १९९ धावा केल्या. या सामन्यात पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर त्याने नाराजी व्यक्त केली.

ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ८९ व्या षटकात घडली. त्या षटकातील पाचव्या चेंडूवर लेग साईडच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर पडिक्कल बाद झाला. तो चेंडू विकेटकीपरने पकडला, मात्र चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नाही असा युक्तिवाद भारतीय फलंदाजाने केला. त्याने चेंडू बॅटपासून किती दूर होता, असे पंचाना खुणावलेदेखील. चेंडू बॅटला लागताना थोडा आवाज झाला, पण तो पॅडला लागून आला असावा. पंचांनी त्याला बाद दिले.

भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळली जात आहे. अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम (DRS) नसल्यामुळे पडिक्कलला बाद दिलेल्या पंचांच्या निर्णयाला आव्हान देता येत नाही.

पडिक्कलचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १२ वे शतक होते. त्याने भारतासाठी ४ कसोटी सामने खेळताना २ शतके झळकावली आहेत.

या सामन्यातील भारताचा पहिला डाव ११३ धावसंख्येवरच संपुष्टात आला होता, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३१७ धावा करून आघाडी घेतली होती. भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता भारताने पडिक्कलच्या १९९ धावा, साई सुदर्शनच्या ९१ धावा, यश राठोडच्या ६६ धावा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ५१* धावांच्या जोरावर ८ विकेट्स गमावून ४८८ धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर सुंदरसोबत आकाश दीप उपस्थित आहे. (Devdutt Padikkal furious after a controversial umpiring decision missed double century by 1 run NZ A vs IND A)

न्यूझीलंड विरुद्ध भारत दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी फलंदाजीमध्ये चुरस दिसणार आहे. संघात केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सुदर्शन आणि पडिक्कल यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---