---Advertisement---

याला म्हणतात १-नंबर षटकार! उनाडकटच्या पहिल्याच चेंडूवर ‘त्याने’ ठोकला गगनचुंबी सिक्सर

---Advertisement---

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेजर्स बेंगलोर संघात इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १५वा सामना झाला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील चौथा सामना होता. सामन्यादरम्यान बेंगलोर संघाचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकलने सलामीला फलंदाजी करताना दमदार षटकार मारला.

झाले असे की, नाणेफेक जिंकत राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात १५४ धावा केल्या. राजस्थानच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाची ठरलेली सलामी जोडी, पड्डीकल आणि ऍरॉन फिंच मैदानावर उतरले. पड्डीकलला डावातील पहिल्या षटकातील फक्त पहिला चेंडू खेळण्याची संधी मिळाली, त्यावर त्याने एक धाव घेतली. पुढे स्ट्राईकवर आलेल्या फिंचने षटकातील उर्वरित ५ चेंडू खेळले.

त्यानंतर डावातील दूसरे षटक टाकण्यासाठी राजस्थानचा गोलंदाज जयदेव उनाडकट आला. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पड्डीकलने शानदार षटकार मारला. त्याचा तो षटकार तब्बल ७९ मीटर दूर गेला.

पड्डीकलच्या या जबरदस्त षटकाराचा व्हिडिओ एका चाहत्याने ट्विटर अकाउंचवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १६३ लाईक्स आणि ८९ रिट्विट्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने तर, “या क्षणाने मला युवराज सिंग विरुद्ध ब्रेट लीच्या क्षणाची आठवण करुन दिली. पड्डीकल हा नक्कीच भविष्यात मोठी कामगिरी करेल,” अशी कमेंट केली आहे.

https://twitter.com/Spiderverse17/status/1312368560300158978?s=20

 

https://twitter.com/LoyalSachinFan/status/1312366929257013249

पुढे पड्डीकलने दमदार फटकेबाजी करत ४५ चेंडूत ६३ धावा कुटल्या. यात त्याच्या ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. १६व्या षटकातील ५व्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने त्याला त्रिफळाचीत केले.

 

महत्त्वाच्या बातम्या-

१९ वर्षाच्या पोराने दाखवला अनुभवी धोनीच्या सीएसकेला कात्रजचा घाट, वाचा ‘त्या’ मॅचविनरची पाॅवरफुल खेळी

ट्रेंडिंग लेख-

यशस्वी जयस्वाल आणि धोनीच्या फोटोने घातलाय युपीतील ‘या’ जिल्ह्यात धुमाकूळ, वाचा काय आहे नक्की स्टोरी

आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---