इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अनेक विक्रम केले. पदार्पण कसोटीत डावखुरा फलंदाजांमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. या आकडेवारीत त्याने भारताच्या शिखर धवन याला मागे टाकले. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धवनने १८७ धावा केल्या होत्या.
पदार्पणाच्या कसोटीत डावखुर्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक रुडोल्फच्या नावावर आहे. त्याने २०३ मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद २२२ धावा केल्या होत्या. या यादीत वेस्ट इंडीजचा काइल मायर्स दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने याच वर्षी बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करताना नाबाद २१० धावा केल्या होत्या.
कॉनवे पहिल्या कसोटी सामन्यात १५० किंवा अधिक धावा करणारा न्यूझीलंडचा तिसरा फलंदाजही ठरला आहे. यापूर्वी मॅथ्यू सिन्क्लेअरने वेस्ट इंडिजविरुद्ध १९९९ मध्ये वेलिंग्टन येथे २१४ धावा केल्या होत्या. त्याचवेळी हमीश रदरफोर्डने २०१३ मध्ये इंग्लंडविरूद्ध ड्युनिडिन येथे १७१ धावा बनविलेल्या.
कॉनवे हा जगातील सातवा आणि न्यूझीलंडचा दुसरा असा फलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात पदार्पणात दुहेरी शतक झळकावले. यासह त्याने १२५ वर्ष जुना विक्रमही मोडला. लॉर्ड्स येथे पदार्पणात कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा कॉनवे पहिला फलंदाज ठरला.
यापूर्वी, के एस रणजित सिंग यांनी इंग्लंड संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण कसोटी सामन्यात १५४ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, १८८० मध्ये इंग्लंडच्या विल्यम्स ग्रेस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पण कसोटी सामन्यात १५२ धावा ठोकलेल्या.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे पदार्पण सामन्यात १३१ धावा फटकावलेल्या. लॉर्ड्स येथे १०० किंवा त्यापेक्षा धावा करणारा कॉनवे हा तिसरा नॉन-ब्रिटिश खेळाडू देखील आहे. गांगुलीशिवाय ऑस्ट्रेलियाच्या हॅरी ग्रॅहॅमने १८९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १०७ धावा केल्या होत्या.
सौरव गांगुली आणि कॉनवेचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे ८ जुलै रोजी असतो. गांगुलीचा जन्म ८ जुलै १९७२ रोजी कोलकाता येथे तर, डेवॉन कॉनवेचा जन्म १९९१ साली दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्ग येथे झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीने घातलेली २ वर्षांची बंदी पूर्ण करुन सनथ जयसुर्या ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास सज्ज
न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणतो, विराट कोहली आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वात आहे ‘हा’ फरक
वेस्ट इंडिज, इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर; मोईन खान यांच्या मुलाला मिळाली संधी