---Advertisement---

व्वा रं पठ्ठ्या! ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम

---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात ‘क्रिकेटची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पहिला कसोटी सामना झाला. बुधवारपासून (२ जून) सुरु झालेला हा सामना न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने त्याच्या फलंदाजीने गाजवला. विशेष म्हणजे कॉनवेने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे त्याने एक मोठा विश्वविक्रमही केला आहे.

पदार्पणात विश्वविक्रम 
न्यूझीलंडकडून कसोटीत पदार्पण करणारा कॉनवे २८१ वा खेळाडू आहे. त्याने या सामन्यात न्यूझीलंडकडून पहिल्या डावात २०० धावांची खेळी केली. ही खेळी त्याने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकारासह केली. त्याच्या या द्विशतकामुळे न्यूझीलंडने ३७८ धावा प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात केल्या. तसेत इंग्लंडचा पहिला डाव २७५ धावांवर रोखत १०३ धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना कॉनवे २ चौकारांसह ६४ चेंडूत २३ धावा करुन बाद झाला. त्यामुळे या सामन्यात कॉनवेने दोन्ही डावात मिळून सलामीला फलंदाजी करताना २२३ धावा केल्या. यामुळे तो क्रिकेट इतिहासात कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ठरला आहे.

हा विश्वविक्रम करताना त्याने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केप्लर वेसेल्स यांचा ३९ वर्षीय जुना विक्रम मागे टाकला आहे. वेसेल्स यांनी १९८२ साली कसोटी पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सलामीवीर म्हणून दोन्ही डावात मिळून २०८ धावा केल्या होत्या.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत कॉनवे ५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजने लॉरेन्स रो आहेत. त्यांनी १९७२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ३१४ धावा केल्या होत्या. तर त्यांच्या पाठोपाठ आरइ फॉरेस्ट (३०६), यासिर हमीद (२७५) आणि काईल मायर्स (२५०) हे आहेत.

लॉर्ड्वर पदार्पणात द्विशतक करणारा पहिला क्रिकेटपटू
कॉनवेने पहिल्याच डावात २०० धावांची खेळी केल्याने लॉर्ड्सवर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीनेही १९९६ साली त्याचे कसोटी पदार्पण लॉर्ड्सवर केले होते. तसेच त्याने पदार्पणाच्या सामन्यात १३१ धावांची खेळी केली होती. कॉनवे लॉर्ड्सवर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

न्यूझीलंडचे इंग्लंडला २७३ धावांचे आव्हान
न्यूझीलंडने त्यांचा दुसरा डाव ६ बाद १६९ धावांवर घोषित केला. या डावात न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली तर रॉस टेलरने ३३ धावा केल्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. हा डाव १६९ धावांवर घोषित केल्याने न्यूझीलंडने पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला २७३ धावांचे विजयासाठी आव्हान दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“१३० कोटींच्या देशांत कसोटी खेळणाऱ्या ३०२ खेळाडूंपैकी मी एक”, दिग्गज खेळाडूने व्यक्त केले समाधान

फाफ डू प्लेसिस म्हणतोय, ‘या’बाबतीत आयपीएलपेक्षा सरस आहे पीएसएल

संघसहकारी असावे तर असे! न्यूझीलंड विरुद्ध ४७७ मिनिटे फलंदाजी करत शतक करणाऱ्या बर्न्सचे ड्रेसिंगरुममध्ये खास स्वागत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---