भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ दाखवला. सलामीवीर डेवॉन कॉनवे व डॅरिल मिचेल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांनी न्यूझीलंडने 6 बाद 176 अशी धावसंख्या उभारली. आपल्या लाजवाब खेळी दरम्यान कॉनवेने टी20 क्रिकेटमधील एका नव्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले.
वनडे मालिकेत पराभूत झाल्यानंतर टी20 मालिकेतील या पहिल्या सामन्यात कॉनवे व फिन ऍलन या जोडीने न्यूझीलंडला वेगवान सुरुवात दिली. ऍलन बाद झाल्यानंतर कॉनवेने जबाबदारी घेत 35 चेंडूंवर 52 धावांची खेळी केली. यात 7 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या आतापर्यंतच्या टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 36 सामन्यात 48.88 च्या सरासरीने 1222 धावा चोपल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कमीत कमी 1000 धावा बनवताना ज्या फलंदाजांची सरासरी सर्वोत्तम आहे त्यामध्ये कॉनवे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याची सरासरी 48.88 अशी आहे. त्याने आपल्या या खेळी दरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (48.78) याला मागे टाकले. या यादीमध्ये भारताचा विराट कोहली अव्वलस्थानी आहे. त्याची सरासरी 52.73 अशी राहिलेली. भारताचा सूर्यकुमार यादव या यादीमध्ये चौथ्या स्थानी असून, त्याची सरासरी 46.41 इतकी होती.
या सामन्याचा विचार केल्यास, न्यूझीलंडने फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर, तुफानी फलंदाजी केली. फिन ऍलनने वादळी 35 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कॉनवेने अर्धशतक करत संघाचा डाव पुढे नेला. अखेरच्या षटकांमध्ये मिचेल याने झंझावाती नाबाद अर्धशतक करत संघाला 176 पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 2 बळी मिळवले.
(Devon Conway T20I Average Goes Behind Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट