दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकला. शुक्रवारी (1 सप्टेंबर) मालिकेतील दुसरा सामना खेळला. युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याच्यासाठी ही मालिका निराशाजनक ठरताना दिसली.
डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) दक्षिण आफ्रिका संघाचा युवा आणि गुणवंत फलंदाज आहे. त्याने जगभरातील वेगवेगळ्या लीग स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहेत. त्याआधी ब्रेविस दक्षिण आप्रिकेसाठी 19 वर्षांखाली विश्वचषक देखील खेळला आहे. मागच्या काही वर्षांपासून चाहते ब्रेविसच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत होते. बुधवारी (30 ऑगस्ट) ब्रेविसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, फलंदाजी आष्टपैलू या संधीचा फायदा घेऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ब्रेविस अवघ्या 5 धावा करून बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला 111 धावांनी पराभूत केले. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी खेळला गेला, ज्यामध्ये ब्रेविसला एकही धाव करता आली नाही. कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ब्रेविस आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ओळखला जाऊ लागला होता. त्याला दक्षिण आफ्रिका संघाचा पुढचा एबी डिविलियर्स (AB De Viliers) म्हटले जाऊ लागले होते. पण त्याचा हा हिरो ते झिरोचा प्रवास चाहत्यांसाठी निराशाजनक ठरत आहेत. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ब्रेविसच्या प्रदर्शनावर चाहत्यांची नजर असेल.
ब्रेविस इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. जगभरातील इतर काही लीगमध्येही ब्रेविस एमआय फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करत आहे. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा हादेखील मुंबई इंडियन्सचा फलंदाज आहे. तिलकनेही नुकतेच वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतासाठी पदार्पण केले असून आता तिलकने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. येत्या काळात या दोघांवरही चाहत्यांची नजर असणार आहे. (Dewald Brevis has failed to make an impact so far in this series against Australia.)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानी अष्टपैलूकडून विराटचे कौतुक, पाहा व्हिडिओ
ASIA CUP: भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार ‘पेस वॉर’! दोन संघाचे तोफखाने सज्ज