मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याच्यासाठी आयपीएल २०२२चा हंगाम शानदार राहिला आहे. त्याने या पदार्पणाच्या हंगामात धडाकेबाज खेळी खेळत सर्वांना प्रभावित केले आहे. अशात आता ब्रेविसने आपल्या पहिल्या आयपीएल हंगामाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंसोबत खेळणे शानदार होते. तसेच त्याला येथून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्याचेही ब्रेविसनेही सांगितले आहे.
ब्रेविसने (Dewald Brevis) आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी १९ वर्षांखालील विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन केले होते. दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात काही विस्फोटक खेळी खेळल्या होत्या. त्याने या हंगामात सर्वाधिक ५०६ धावाही केल्या होत्या. याच कारणामुळे त्याची तुलना एबी डिविलियर्सशी केली जाऊ लागली होती. त्याला क्रिकेटप्रेमींनी ‘बेबी एबी‘ (Baby AB) असे टोपणनावही दिले आहे.
आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावापूर्वी चर्चेत राहिल्याचा ब्रेविसला चांगलाच फायदा झाला होता. मेगा लिलावात त्याला विकत घेण्यासाठी बरेच संघ उस्तुक होते. अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ३ कोटींची मोठी बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. ब्रेविसनेही मुंबई संघाला निराश केले नाही. त्याने या हंगामात ७ सामने खेळताना २३च्या सरासरीने १६१ धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४९ धावा इतकी राहिली.
"Everything happens for a reason and you have to trust it."
🎥 DB shares his experiences from the season gone by! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @BrevisDewald MI TV pic.twitter.com/9OeOb2jlx5
— Mumbai Indians (@mipaltan) May 28, 2022
अशात मुंबई संघाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ब्रेविस आपल्या पहिल्या आयपीएल हंगामाबाबत प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ब्रेविस म्हणतो (Brevis On First IPL Campaign) की, “मला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंविरोधात खेळायला फार मजा आली. ही खूप महत्त्वपूर्ण बाब होती. मी मैदानावर फक्त माझा नैसर्गिक खेळ दाखवला. मी फलंदाजी करताना चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही, हे सर्व आपोआप घडत गेले. फलंदाजी करताना केव्हा बचावात्मक खेळी करायची आणि केव्हा वेळ घेऊन खेळायचे, असा बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी मला समजल्या. मी खूप काही शिकलो आणि खेळाचा आनंद लुटला.”
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेक्स्ट विराट’ मानला गेलेल्या उन्मुक्त चंदचं नक्की चुकलं काय? वाचा त्याच्या प्रवासाबद्दल
विराटच्या आयपीएल २०२२मधील सरासरी प्रदर्शनावर हताश नाही दिग्गज फलंदाज, कारणही केले स्पष्ट
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे ३१ मे पासून पुण्यात आयोजन