---Advertisement---

तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा मानांकित खेळाडूंवर विजय

---Advertisement---

पुणे, २४ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात तेलंगणाच्या संस्कृती ढमेरा हिने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असंलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या व बाराव्या मानांकित संस्कृती ढमेराने पाचव्या मानांकित व महाराष्ट्राच्या धरणा मुदलियारचा ६-१, ६-२ असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या व अव्वल मानांकित सालसा आहेर हिने सोळाव्या मानांकित व महाराष्ट्राच्या बेला ताम्हणकरचा ३-६, ६-१, ६-० असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. हरियाणाच्या संदीप्ती रावने महाराष्ट्राच्या सुदिप्ता कुमारवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या व सहाव्या मानांकित प्रेरणा विचारेने आपलीच राज्य सहकारी रिचा चौगुलेचे आव्हान ६-०, ७-५ असे मोडीत काढले.

मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या क्रिश पटेल याने महाराष्ट्राच्या गिरीश चौगुलेचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. गुजरातच्या व सहाव्या मानांकित केविन पटेलने ओरिसाच्या व अकराव्या मानांकित कबीर हंसचा १-६, ६-३, ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव केला. दिल्लीच्या व पाचव्या मानांकित सार्थक सुदन याने हरियाणाच्या व बाराव्या मानांकित जगतार अरोराचा टायब्रेकमध्ये ६-२, १-६, ७-६(६) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: 16 वर्षाखालील मुली: सालसा आहेर(महा,१)वि.वि. बेला ताम्हणकर(महा,१६)३-६, ६-१, ६-०;संदीप्ती राव(हरियाणा) वि.वि.सुदिप्ता कुमार(महा)६-४, ६-४;भक्ती परवानी(गुजरात, ४)वि.वि.कशिश भाटिया ६-४, ६-२;प्रेरणा विचारे(महा,६)वि.वि.रिचा चौगुले(महा,९)६-०, ७-५; संस्कृथी ढमेरा(तेलंगणा,१२)वि.वि.धरणा मुदलियार(महा,५)६-१, ६-२;प्रतिभा नारायण(कर्नाटक,३)वि.वि.वंशिका चौधरी(उत्तरप्रदेश,१३)६-२, ६-३; ऋतुपर्णा चौधरी(ओरिसा,१०)वि.वि.स्म्रिती भसिन(तेलंगणा)६-२, ६-४; तनिशा कश्यप(आसाम,२)वि.वि.दिपलक्ष्मी वनराजा(तामिळनाडू)६-०, ६-१;

१६ वर्षाखालील मुले: क्रिश पटेल(गुजरात)वि.वि.गिरीश चौगुले(महा)६-१, ६-१; केविन पटेल(गुजरात,६)वि.वि.कबीर हंस(ओरिसा,११)१-६, ६-३, ६-३; अमन खान(आंध्रप्रदेश,१५)वि.वि.रिषी कृष्णा(तामिळनाडू)६-२, १-६, ६-१; सार्थक सुदन(दिल्ली,५)वि.वि.जगतार अरोरा(हरियाणा,१२)६-२, १-६, ७-६(६); ह्रिदम मल्होत्रा(दिल्ली,८)वि.वि.दिवेश गेहलोट(हरियाणा, १०)६-१, ७-५; देव जावीया(गुजरात,३)वि.वि. कुशन शहा(गुजरात,१३)७-५, ६-२; व्हीएम संदीप(तामिळनाडू,९)वि.वि. उदित गोगोई(आसाम)३-६, ६-३, ६-४; डेनिम यादव(मध्यप्रदेश)वि.वि.अजय मलिक(हरियाणा)६-३, ६-१.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment