सध्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला. आहे. श्रीलंका संघाचा मधल्या फळीतील फलंदाज धनंजय डी सिल्वा मांडीला दुखापत झाल्याने उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. तो दोन आठवड्यासाठी बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती.
सेंचुरीयन येथे कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. त्याच्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होवून मैदानातून बाहेर होता. मैदानावरून बाहेर जाण्याअगोदर तो चांगली फलंदाजी करत होता आणि 79 धावांवर खेळत होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात सांगितले होते दुखापत गंभीर असल्याने धनंजय डी सिल्वा दोन आठवड्यासाठी क्रिकेटमधून बाहेर झाला आहे.
श्रीलंका संघाची दमदार फलंदाजी
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध श्रीलंका संघाने दमदार फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी पहिल्या डावात सर्वबाद 396 धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश चंडीमलनी चांगली फलंदाजी करताना 85 धावांची खेळी केली होती. धनंजय आणि दिनेश चांगली भागीदारी करत होते. मात्र धावताना धनंजयला दुखापत झाली आणि त्याला मैदानावरून बाहेर घेवून जाण्यात आले.
त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यामधून समजले की त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे आता तरी मैदानावर परतणार नाही. दोन आठवड्यानंतर त्याची पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतर स्पष्ट केली जाईल की, तो खेळण्यास पात्र आहे असेल की नाही.
JUST IN: Dhananjaya de Silva has been ruled out of the #SAvSL series with a thigh strain.
The Sri Lanka batsman, who retired hurt on 79 on Saturday, is expected to be sidelined for two weeks. pic.twitter.com/ImpQWoQrS5
— ICC (@ICC) December 27, 2020
श्रीलंका संघाचा पहिला डाव
श्रीलंका संघाने 6 बाद 340 धावांवर पुढे खेळताना 96 षटकात सर्वबाद 396 धावा केल्या आहेत. यामध्ये डिक्वेलाने 86 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याचबरोबर शनाकाने 66 धावांची नाबाद खेळी साकारली आणि संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. त्यानंतर इतर कोणते खेळाडू मोठी खेळी करू शकले नाहीत.
दक्षिण आफ्रिका संघाने आपला पहिला डाव खेळताना, दुसरा दिवसाचा खेळ संपेपर्यंत 72 षटकात 4 बाद 317 धावा केल्या. यामधे एल्गरने 95 धावांची खेळी साकारली. तर एडेन मार्क्रम 68 धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसी आणि बावुमा हे अनुक्रमे 55 आणि 41 धावांवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
गावसकरांनी केली रहाणेची स्तुती; म्हणाले…
अजिंक्य रहाणेचे अभिनंदन करणे कोहलीला पडले महागात! ‘या’ कारणाने चाहत्यांनी केले ट्रोल