भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अप्रतिम डान्सर आणि कोरियोग्राफर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या धनश्री वर्माच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. परंतु सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
धनश्री वर्माचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. यावर ती आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये तिने कोरियोग्राफ केलेल्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील खेळाडू विराट कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज, ‘ नेवर गिव अप, डोन्ट बॅक डाऊन, किप हसलिंग’ या गाण्यावर थिरकताना दिसून येत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यांनी आपल्या सपोर्ट स्टाफ आणि समर्थकांचे आभार मानण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे. कारण खेळाडू मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओला हर्ष उपाध्यायने संगीत दिले आहे.
भविष्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील खेळाडू या स्पर्धेत कशी पुढे जातील याची झलकही या व्हिडिओतून मिळते. व्हिडीओमध्ये ‘प्ले बोल्ड’चा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांची खेळाप्रती असलेली ऊर्जा दिसून येते.
https://www.instagram.com/tv/CWmscnEJNlj/?utm_medium=copy_link
एक कोरीयोग्राफ्रर म्हणून हा धनश्री वर्माचा मोठा प्रोजेक्ट होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, ” शेवटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नवीन म्युझिक व्हिडिओ तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास मी उत्सुक आहे. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि २०२१ चा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ देखील आहे. या दिग्गजांसोबत काम करणे, जे फक्त क्रिकेटमध्येच नव्हे तर प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक आहेत.ही माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती. मला ही संधी दिल्याबद्दल मी सर्व क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानते.”
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयसचे कसोटी पदार्पण जवळपास पक्के, पण तरी ‘या’ फलंदाजाकडून मिळू शकते आव्हान
“तो फॉर्ममध्ये येईल आणि धावा देखील करेल”, सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणेची पुजाराकडून पाठराखण
कानपूरचे मैदान गाजवण्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव!! बीसीसीआयने शेअर केले फोटो