---Advertisement---

चहल भाऊ लईच नशीबवान! चाहते तर सोडाच आता पत्नीच म्हणाली, “मीच तुझी सर्वात मोठी…”

On: शनिवार, जुलै 23, 2022 8:40 PM
Yuzvendra-Chahal-And-Dhanashree-Verma
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा त्याचा शनिवारी (२३ जुलै) ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष दिवशी सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र चहलला सर्वात उत्तम शुभेच्छा कोणी दिल्या असतील तर त्याची पत्नी धनश्री वर्माने.

धनश्रीने आपल्या पतीसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे. हा संदेश तिने इंन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यासोबत काही फोटोही शेयर केले आहेत. तिच्या या विशेष शुभेच्छांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

धनश्रीने इंन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘जीवन हा एक प्रवास आहे, मात्र विचार केला असता तो एक सुंदर ठरत आहे. तू एक चांगला माणूस असून तुझ्यावर देवाची अशीच कृपा राहावी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युझवेंद्र चहल. मी तुझी खुप मोठी चाहती आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री यांची प्रेमकहानी खूपच निराळी आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाउन लागला असता चहलने त्याला डान्स शिकायचा हे ठरवले होते. तेव्हा धनश्री ही डान्स टिचर होती तर चहलने तिच्याशी संपर्क साधला. डान्स शिकता-शिकताच दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.

चहलला बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनीही त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1550550612491677696?s=20&t=k9c3z5pMbjiPu04e4g0zxw

https://twitter.com/BCCI/status/1550699728366616576?s=20&t=k9c3z5pMbjiPu04e4g0zxw

त्याचबरोबर कुलदिप यादव, चेतेश्वर पुजारा, नवदिप सैनी आणि सुरेश रैना यांनीही चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/ImRaina/status/1550732727061807106?s=20&t=mno6Xu7-JdHq5p_uJvU6dw

चहलने भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या ६५ वनडे सामन्यांमध्ये ११३ बळी घेतले आहेत. त्याने ४२ धावांत ६ गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने ६२ टी २० सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आहेत, त्यामध्ये त्याची उत्तम कामगिरी २५ धावा देत ६ विकेट्स ही राहिली आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1550684627714588672?s=20&t=k9c3z5pMbjiPu04e4g0zxw

याशिवाय चहलने २०१३मध्ये आयपीएल पदार्पण केले. मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळताना ते आतापर्यंत त्याची कारकीर्दही दमदार आहे. त्याने आयपीएलच्या १३१ सामन्यात १६६ विकेट्स घेतले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर

कुणी तरी येणार येणार गं! अजिंक्य रहाणेच्या घरी हलणार पाळणा, दुसऱ्यांदा बनणार बापमाणूस

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज करतोय क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक; ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी

स्टोक्सनंतर आता बेअरस्टोची मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---