महाराष्ट्रातील क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावेळी स्पर्धा आयोजनाचा मान धाराशिव जिल्ह्याला मिळाला असून, 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या काळात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाईल.
यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगेल. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे हे 65 वे वर्ष आहे. धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानावर ही भव्य स्पर्धा पार पडेल. स्पर्धेत विविध असे 45 संघ सहभागी होणार असून, 20 वजनी गटात ही स्पर्धा खेळली जाईल. जवळपास 900 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आयोजकांकडून विजेत्या खेळाडूंना स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर तसेच बुलेट अशी वाहने देण्यात येतील. जवळपास दोन कोटी रुपयांची बक्षीसे या दरम्यान दिली जातील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
मागील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे येथे पार पडल्या होत्या. त्यावेळी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बक्षिसे लावण्यात आलेली. काहीशा वादग्रस्त ठरलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचे अनेक कुस्तीप्रेमी म्हणताना दिसलेले. अखेर नाशिक जिल्ह्यासाठी खेळणाऱ्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ही स्पर्धा आपल्या नावे केली होती.
(Dharashiv Host Maharashtra Kesari 2023 2024 From 1 To 5 November)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । मेहदी हसन आणि नजमूल शांतोची वादळी शतके! अफगाणिस्तानसमोर बांगलादेशचे मोठे लक्ष्य
मोठी बातमी! तिन्ही फॉरमॅट जावणारा पाकिस्तानी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! शेअर केली सविस्तर पोस्ट