संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव शनिवारी (10 सप्टेंबर) समाप्त झाला. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी ते इतर क्षेत्रातील अनेक नामांकित लोकांनी रस्त्यावरही हजेरी लावली. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हा देखील मुंबई येथील गणेशोत्सवात सामील झालेला दिसून आला. त्याने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत चक्क ड्रम वादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला गेलेला हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक मंडळे यात सहभागी होत असतात. या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीचे दृश्य अनेकजण डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईत येतात. अनेक छोटी मोठी मंडळी आपल्या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढतात. अशाच एका मिरवणुकीत भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हा देखील सहभागी झाला. इतकेच नव्हे तर त्याने चक्क त्या मिरवणुकीत वादन करणारा बँजो ग्रुप जॉईन केला.
https://www.instagram.com/reel/CiSm87IJ5by/?igshid=MDJmNzVkMjY=
धवलने थेट ड्रम सेटचा ताबा घेत वादनाला सुरुवात केली. ‘ले गई दिल मेरा मनचली’ या सुप्रसिद्ध हिंदी गाण्यावर त्याने अतिशय कौशल्याने ड्रम वादन केल्याचे दिसून येत आहे. आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन देत लिहिले,
‘बजाओ.. बऱ्याच दिवसांनी वाजवले’ त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच प्रसिद्धी मिळते. त्याच्यातील हा सुप्त गुण कोणालाही माहीत नव्हता अशी काही जणांनी कमेंट केली.
धवल कुलकर्णी हा भारतीय संघासाठी 12 वनडे व 2 टी20 सामने खेळला आहे. 33 वर्षाच्या धवलने भारतासाठी आपला अखेरचा सामना 2016 मध्ये खेळलेला. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट