शिखर धवन आणि संघ शुक्रवारी (३० जुलै) श्रीलंका दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. तिथे त्यांनी श्रीलंकाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली आहे. सुरुवातीच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजयी पताका झळकावली होती. तर श्रीलंकेने पराभवाचा वचपा काढत भारताला टी२० मालिकेत २-१ ने पराभवाची धूळ चारली. यानंतर शुक्रवार रोजी भारतीय संघ बेंगलोर येथे परतला आहे. अशात गोलंदाज दिपक चाहर याने प्रवासादरम्यानचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
चाहरने पोस्ट केलेल्या व्हिडिओत, कर्णधार शिखर, उपकर्णधार भुवनेश्वर कुमार यांच्यासह संघातील इतर खेळाडू कोलंबोच्या विमानातळावर स्टायलिश एंट्री मारताना दिसत आहेत. धवन आपल्या शॉर्ट्स आणि चष्म्यांमध्ये खूप स्टायलिश दिसत आहे. तसेच भुवनेश्वरनेही सुंदर असे चष्मे घातले आहेत. कर्णधार आणि उपकर्णधाराच्या मागे उरलेला संघ प्रवेश करताना दिसतो आहे.
इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत चाहरने मागे अक्षय कुमारच्या हिंदी चित्रपट, ‘बॉस’चे टायटल साँग जोडले आहे. या गाण्यामुळे व्हिडिओ पाहायला अजूनच प्रभावी वाटतो आहे. त्याच्या हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.
https://www.instagram.com/reel/CR84EO_BPJJ/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय संघ पोहोचला बेंगलोर येथे
श्रीलंका दौरा संपवून भारतीय संघ शुक्रवारी उशीरा बेंगलोर येथे पोहोचला. कोरोनाबाधित असलेले कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल व कृष्णप्पा गौतम हे उर्वरित संघासह भारतात आले नाहीत. बेंगलोर येथे पोहोचलेले खेळाडू आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतर आपापल्या शहराकडे रवाना होतील.
कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्याने पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. ते सध्या कोलंबोमध्ये असून शनिवारी (३१ जुलै) इंग्लंडला जाण्यासाठी उड्डाण भरतील. इंग्लंडमध्ये जखमी झालेल्या वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान यांचे बदली खेळाडू म्हणून त्यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावरही ते दोघे क्वारंटाईन राहतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरू होणार आहे.
येत्या टी२० विश्वचषकापुर्वी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी अखेरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका असणार आहे. यानंतर भारतीय संघातील खेळाडू युएईमध्ये आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा
मोठी बातमी! भारताविरुद्धच्या लढतीनंतर श्रीलंकेच्या ‘या’ ३३ वर्षीय क्रिकेटरने घेतली निवृत्ती
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर