भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने मंगळवारी (७ जुलै) आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान त्याला जगभरातील क्रिकेटपटू व चाहत्यांनी सोशल मीडियामार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात जेव्हा घरातून बाहेर पडणे कठीण आहे, तेव्हा अशामध्ये धोनीने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. आता सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वाढदिवसादिवशी धोनी आपल्या बाईकचा आनंद घेताना दिसत आहे.
वाढदिवसादिवशी धोनी घेतोय बाईकची मजा
कॅप्टन कूल धोनी (MS Dhoni) आपल्या फार्महाऊसवरून बाईक वर फिरताना आणि चाहत्यांच्या समोरून जाताना दिसत आहे. चाहते जोर- जोरात ओरडत धोनीला वाढदिवासाच्या शुभेच्छा देत आहेत तसेच त्याला एकदा बाहेर येण्याची विनंतीही करत आहेत. परंतु धोनी आपल्या बाईकचा आनंद घेताना दिसला.
That’s the way – Mahi way!🥰
Here’s @msdhoni enjoying bike ride at his farm house. #HappyBirthdayDhoni pic.twitter.com/XZD07MpMw9
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) July 7, 2020
झिवानेही गायले आपल्या वडिलांसाठी गाणे
धोनीला आपल्या वाढदिवसादिवशी एक अप्रतिम अशी भेट मिळाली आहे. ती अशी की धोनीला आपली मुलगी झिवाने त्याच्या वाढदिवसादिवशी एक छान गाणं म्हटलं आहे. झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
त्या व्हिडिओत झिवा धोनीच्या कुशीत आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंडला झिवाच्या आवाजातील इंग्रजी गाणं वाजत आहे. या गाण्यामार्फत झिवाकडून आपल्या वडिलांना प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CCVhMnUnNhD/
१ वर्ष झाले धोनीला क्रिकेट खेळून
धोनी आता जवळपास १ वर्षापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मागील वर्षी जुलै विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं.
तेव्हापासून आतापर्यंत फक्त धोनीच्या पुनरागमनाची चर्चा सुरु आहे. परंतु आतापर्यंत धोनीने त्याच्या पुनरागमनाविषयी कोणतेही विधान केलेले नाही तसेच संघ व्यवस्थापनाकडूनही याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. तरीही नुकतेच धोनीचा मॅनेजर व लहानपणीचा मित्र मिहीर दिवाकरने याबाबतीत खुलासा केला होता की धोनी अद्याप निवृत्तीचा विचार करत नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तब्बल ११७ दिवसांनी क्रिकेट प्रेमींनी पाहिला असा अफलातून क्लिन बोल्ड
-गोष्टच पहिल्या दिवशी अशी घडली की जोफ्रा आर्चरला आजही काय करावे सुचेना!
-टिममेट्सकडून आदर्श घेत ‘या’ खेळाडूने केले तब्बल १२ किलो वजन कमी