दुबई। 28 सप्टेंबरला एशिया कप 2018 चा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवून सातव्यांदा एशिया कपवर आपले नाव कोरले.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने 2 यष्टीचीत केले आहेत. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही खास विक्रम केले आहेत. धोनीने 510 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना यष्टीमागे 800 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
याबरोबरच धोनीने केले हे खास विक्रम-
-धोनी यष्टीमागे 800 विकेट्स घेणारा केवळ तिसरा यष्टीरक्षक. याआधी मार्क बाउचर आणि अॅडम गिलख्रिस्टने केला आहे असा पराक्रम. बाउचरने 467 सामन्यात 998 विकेट्स आणि गिलिख्रिस्टने 396 सामन्यात 905 विकेट्स घेतल्या आहेत.
यष्टीरक्षकांची यष्टीमागील आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी
९९८- मार्क बाऊचर
९०५- अॅडम गिलख्रिस्ट
८००- एमएस धोनी#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @kridajagat @HashTagMarathi @BeyondMarathi #AsiaCup #AsiaCup18— Sharad Bodage (@SharadBodage) September 28, 2018
– धोनी हा यष्टीमागे 800 विकेट्स घेणारा पहिला आशियाई यष्टीरक्षक ठरला आहे. आशियाई यष्टीरक्षकांमध्ये धोनीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर 678 विकेट्ससह कुमार संगकारा आहे.
यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे आशियाई यष्टीरक्षक –
800 – एमएस धोनी
678 – कुमार संगकारा
453 – कमरान अकमल#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain @kridajagat— Pranali Kodre (@Pranali_k18) September 28, 2018
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने 510 आंतरराष्ट्रीय सामन्यात 184 यष्टीचीत केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक-
184 – एमएस धोनी
139 – कुमार संगकारा
101 – रोमेश कालूविथाना#म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) September 28, 2018
-एशिया कपमध्ये वनडेत यष्टीमागे सर्वाधिक 36 विकेट्स घेण्याच्या संगकाराच्या विक्रमाशी धोनीने बरोबरी केली आहे. धोनीनेही यष्टीमागे 36 विकेट्स घेतल्या आहेत.
एशिया कपमध्ये वनडेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक-
36 – एमएस धोनी
36 – कुमार संगकारा
17 – मोइन खान#म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) September 28, 2018
महत्वाच्या बातम्या-
–गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार
–भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम