दुबई। 28 सप्टेंबरला भारत विरुद्ध बांगलादेश संघात एशिया कप 2018चा सामना पार पडला. रोमांचरी झालेल्या या सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवत सातव्यांदा एशिया कपवर नाव कोरले आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघ दुबईत राहत असलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधून बाहेर पडत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की चाहते भारतीय संघाला तसेच धोनी आणि कर्णधार रोहित शर्माचेही नाव घेत प्रोत्साहन देत होते.
याबरोबरच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीकडून एक खास गोष्ट पहायला मिळाली. तो जेव्हा हॉटेलमधून बाहेर येत होता आणि बसमध्ये बसण्यासाठी जात होता तेव्हा पाकिस्तानचे मोठा चाहता बशीर चाचा (चाचा शिकागो) यांनी धोनीवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली.
या पाकळ्या चाचा उधळत असताना त्यातील काही पाकळ्या धोनीने झेलल्या आणि पुन्हा त्यांच्याच अंगावर उधळून हसत बसमध्ये चढला.
From the Driver's seat 📽️: #TeamIndia depart for the grand finale of #AsiaCup against 🇧🇩 #INDvBAN 😎 pic.twitter.com/YV2usS6ICH
— BCCI (@BCCI) September 28, 2018
या सामन्यात धोनीने 36 धावा केल्या, तसेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे 800 झेल घेण्याचाही विक्रम केला आहे. असे करणारा तो जगातील तिसराच यष्टीरक्षक ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाच्या या ११ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम
–आॅस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर असा पराक्रम करणारा भारत बनला तिसराच संघ